नवी पिढी घडविताना शिक्षकांनी सजग राहणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:23 IST2020-12-31T04:23:35+5:302020-12-31T04:23:35+5:30
वडणगे : एक इंजिनिअर चुकला तर एका इमारतीचे नुकसान होऊ शकते, एक डॉक्टर चुकला तर एका रुग्णाचे नुकसान होऊ ...

नवी पिढी घडविताना शिक्षकांनी सजग राहणे गरजेचे
वडणगे : एक इंजिनिअर चुकला तर एका इमारतीचे नुकसान होऊ शकते, एक डॉक्टर चुकला तर एका रुग्णाचे नुकसान होऊ शकते. मात्र एक शिक्षक चुकला तर एका पिढीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे नवीन पिढीचे भवितव्य घडवताना शिक्षकांनी खूप सजग राहून ज्ञानदानाचे कार्य करायला हवे, असा कानमंत्र प्राचार्य डॉ. सरिता जे. भोसले यांनी दिला. प्रयाग चिखली (ता. करवीर) येथील एस. के. पाटील शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या वर्ष २०१८-२० बॅचचा निरोप समारंभ व माजी विद्यार्थी मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी प्रा. डॉ. जे. जी. पाटील, प्रा. पी. आर. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वृषाली जिरगे, स्नेहा शिंदे, ऋतुजा पाडेकर, पल्लवी भोई, शिवाजी नवले, उमेश चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. प्रवीण पाटील, प्रा. डॉ. एम. डी. पाटील, प्रा. एम. एन. घुले, सुधीर तानुगडे, ओंकार नाईक यांच्यासह कल्याणी कुलकर्णी, पद्मश्री आडके, दीपाली रजपूत, सीमा गायकवाड, दीपाली फराकटे उपस्थित होते.