शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांचे उपोषण

By admin | Updated: December 19, 2014 00:13 IST

प्रशासनाकडून बेदखल : विविध मागण्यांकडे वेधले लक्ष, विविध संघटनेचे १४ पदाधिकारी सहभागी

कोल्हापूर : जिल्हा परिषद शिक्षण प्रशासनाने १२ डिसेंबरला राबविलेले अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन रद्द करावे, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सर्व प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या संघटनांच्या १४ पदाधिकाऱ्यांनी आज, गुरुवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला प्रारंभ केले. यावेळी जिल्हा परिषद प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणाचा निषेध नोंदविला. आज प्रशासनाने या उपोषणाची दखल घेतली नाही. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन सन २०१४-१५ च्या संचमान्यतेनुसार करावे, समायोजन तारखेच्या चार दिवस आधी अतिरिक्त शिक्षकांची प्राधान्यक्रमाने ज्येष्ठता यादी व रिक्त पदांचा अहवाल प्रसिद्ध करावा, पाचवी ते आठवीचे वर्ग सरसकट विनाअट शाळांना जोडावेत, पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळांना विनाअट मुख्याध्यापक मिळावेत, प्राथमिक शिक्षण विभागाच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, शिक्षकांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला नियमित मिळावे, दप्तर दिरंगाई थांबवावी, शिक्षक आणि शिक्षणाची गुणवत्तेच्या नावावर बदनामी थांबवावी, आदी मागण्यांसाठी उपोषणाला सुरू आहे. उपोषणात शिक्षक समितीचे राजेंद्र पाटील, राजेश सोनपराते, चंद्रकांत पाटील, रवळू पाटील, प्रमोद तौंदकर, शिवाजी आळवेकर, राजू परीट, जोतिराम पाटील, विशाल हारुगले, पुरोगामी संघटनेचे प्रसाद पाटील, भिवाजी काटकर, रवींद्र शेंडे, कास्ट्राईब संघटनेचे गौतम वर्धन, शिक्षक संघाचे सुनील पाटील, आदी सहभागी झाले होते. जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत, सदस्य एकनाथ पाटील, शशिकला रोटे, बाबासाहेब माळी यांनी उपोषणस्थळी भेट दिली. मोर्चाचा निर्णयउपोषणाची दखल प्रशासनाने न घेतल्यास उद्या, शनिवारी टाऊन हॉलपासून जिल्हा परिषदेवरमोर्चा काढण्याचा निर्णय उपोषणकर्त्यांनी घेतला.