अनुदानासाठी शिक्षकांचे ‘ढोलवादन’

By Admin | Updated: June 14, 2016 00:46 IST2016-06-14T00:45:31+5:302016-06-14T00:46:18+5:30

आंदोलनाचा १३ वा दिवस : विनाअनुदानित शाळांतील शिक्षक आज महामार्ग रोखणार

Teachers 'Dholavadan' for grants | अनुदानासाठी शिक्षकांचे ‘ढोलवादन’

अनुदानासाठी शिक्षकांचे ‘ढोलवादन’

कोल्हापूर : शिक्षकांचे बळी घेणाऱ्या शासनाचा निषेध असो’, ‘अनुदान मिळालेच पाहिजे’, अशा घोषणा देत विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांनी सोमवारी ढोलवादन आंदोलन केले. राज्यातील अनुदानपात्र शाळांना त्वरित अनुदान मिळावे, या मागणीसाठी त्यांनी जिल्हा परिषदेसमोर हे आंदोलन केले. आंदोलनातील पुढील टप्पा म्हणून संबंधित आंदोलक शिक्षक आज, मंगळवारी दुपारी बारा वाजता तावडे हॉटेल येथे महामार्ग रोको आंदोलन करणार आहेत.
अनुदान पात्र ठरलेल्या शाळा व वर्ग तुकड्यांना शासनाकडून त्वरित वेतन व अनुदान मिळावे, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समिती आणि राज्यमान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या नेतृत्वाखाली शिक्षकांचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वारात आमरण उपोषण व बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे.
या आंदोलनाच्या १३ व्या दिवशी संबंधित शिक्षकांनी जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर दुपारी साडेबाराच्या सुमारास ढोलवादन आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी ढोल-कैताळचा गजर आणि ‘बळी घेणाऱ्या शासनाचा निषेध असो’, ‘अनुदान मिळालेच पाहिजे’, अशा घोषणा देत शासनाचा निषेध केला. आंदोलनात कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, गजानन काटकर, प्रकाश पाटील, एस. एम. पाटील, शिवाजी खापणे, महासंघाचे संतोष आयरे, राजेंद्र कोरे, मच्छिंद्र जाधव, प्रेमकुमार बिंदगे, खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे, आॅल इंडिया यूथ फेडरेशनचे गिरीष फोंडे, आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Teachers 'Dholavadan' for grants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.