शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
2
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरची अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
3
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
4
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
5
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
6
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
7
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
8
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
9
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
10
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
11
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
12
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
13
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
14
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
15
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
16
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
17
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
18
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
19
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
20
चंद्रभ्रमंती करून ‘स्पेस फ्लाइट’ने घरी परत याल, तेव्हा...

बालकांचे लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकांची बडतर्फी : दौलत देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 14:11 IST

शाळेमध्ये शिक्षकांकडून बालकांचे लैंगिक शोषण झालेल्या घटनांची यादी सादर करा. अशा घटनांमधील शिक्षकाला विभागीय चौकशी करून बडतर्फ केले जाईल. त्याचबरोबर अशा घटनांमध्ये शासकीय अधिकारी-कर्मचारी सहभागी असल्यास त्याच्या बडतर्फीसाठीही शासनाकडे पाठपुरावा करू, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले. करवीर तालुक्यातील वडणगे शाळेत कालच घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी देसाई यांनी आज हे निर्देश दिले.

ठळक मुद्देबालकांचे लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकांची बडतर्फी : दौलत देसाई जिल्हाधिकारी कार्यालयात चाईल्ड लाईन सल्लागार समितीची बैठक

कोल्हापूर : शाळेमध्ये शिक्षकांकडून बालकांचे लैंगिक शोषण झालेल्या घटनांची यादी सादर करा. अशा घटनांमधील शिक्षकाला विभागीय चौकशी करून बडतर्फ केले जाईल. त्याचबरोबर अशा घटनांमध्ये शासकीय अधिकारी-कर्मचारी सहभागी असल्यास त्याच्या बडतर्फीसाठीही शासनाकडे पाठपुरावा करू, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले. करवीर तालुक्यातील वडणगे शाळेत कालच घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी देसाई यांनी आज हे निर्देश दिले.चाईल्ड लाईन सल्लागार समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी हे उपस्थित होते. केंद्र समन्वयक अनुजा खुरंदळ यांनी चाईल्ड लाईन काय करते याविषयी सविस्तर संगणकीय सादरीकरण केले. बालक किंवा बालकांच्या मदतीसाठी 1098 ही हेल्पलाईन आहे.

या हेल्पलाईनवर फोन केल्यास शहरामध्ये असणारी चाईल्ड लाईन टिम 1 तासामध्ये दिलेल्या पत्यावर पोहचते. ही हेल्पलाईन 18 वयोगटापर्यंतच्या मुलांकरिता 24 तास कार्यरत आहे. ऑक्टोबर 2018 ते जुलै 2019 या कालावधीत 22 बालविवाह थांबविण्यात आले आहेत.जिल्हाधिकारी देसाई यावेळी म्हणाले, पालकांना शिक्षित करणे, त्यांचे जगजागरण करणे हेच बालविवाहावर योग्य उत्तर आहे. शाळेमध्ये घडलेल्या घटनांची विस्तृत माहिती मला द्या. दाखल झालेल्या एफआयआरची प्रत मेलवर मिळावी यासाठी पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवा. जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी ग्रामस्तरावर असणाऱ्या जिल्हा बाल संरक्षण कक्षाची माहिती तात्काळ द्यावी.

चाईल्ड लाईननी स्थानिक प्रशासनाला सोबत घेऊन कार्यवाही करावी. ग्रामसेवक,तलाठी यांची मदत घेऊन होणाऱ्या विविध मासिक बैठकांमध्ये त्यांच्यासह पालक यांची काय जबाबदारी आहे, याविषयी माहिती द्यावी. शिक्षण विभाग,उपप्रादेशिक परिवहन विभाग यांनीही 1098 चाईल्ड लाईन विषयी जनजागृती करण्यास प्रयत्न करावेत. चाईल्ड लाईनने जनजागृती करणारे फलक तयार करून शाळा, ग्रामपंचायत, शालेय ठिकाणी प्रदर्शित करावेत. त्यासाठी संपूर्ण सहकार्य केले जाईल, असे आश्वासन डॉ. कलशेट्टी यांनी दिले....आणि तो शिक्षक अखेर बडतर्फच झाला !पुण्याला मुख्य कार्यकारी असताना बारा वर्षापूर्वी शिक्षकाकडून लैंगिक शोषणाचा गुन्हा घडला होता. त्याच्या प्रकरणामध्ये खऱ्या साक्षीदारांना पुढे आणलं नव्हतं. ज्या साक्षीदारांना पुढे आणलं होतं ते फितुर झाले होते. परिणामी गुन्हेगार निर्दोष सुटला होता. निलंबित असणाऱ्या त्या शिक्षकाला पुन्हा सेवेमध्ये घेण्याबाबतचा प्रस्ताव समोर आला. या प्रकरणाची नव्याने सविस्तर चौकशी करून त्यामध्ये मूळ हस्ताक्षरातील साक्षीदाराचा पुरावा,विविध उच्च न्यायालय यांचे निकाल या सर्वांचा अभ्यास केला. त्या शिक्षकाची विभागीय चौकशी लावून शेवटी त्याला नोकरीतून काढून टाकण्यात आले, अशी आठवण जिल्हाधिकारी देसाई यांनी आज सांगितली.या बैठकीला संचालक फादर रोशन, सहाय्यक संचालक फादर लिजो, सुरय्या शिकलगार, बाल कल्याण समितीचे सदस्य के. एस. अंगडी, व्ही. बी. शेटे, वकील गौरी पाटील, सहाय्यक उपप्रादेशिक अधिकारी प्रसाद गजरे आदी उपस्थित होत.

टॅग्स :women and child developmentमहिला आणि बालविकासcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर