शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

Kolhapur: पुस्तक देण्यासाठी घरी आलेल्या मुलीचा विनयभंग केला; शिक्षकास तीन वर्षे सक्तमजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 12:42 IST

घरात मोबाइलवर बघत होता अश्लील चित्रफिती

कोल्हापूर : दहावीचे पुस्तक देण्यासाठी घरी आलेल्या मुलीचा विनयभंग करणारा शिक्षक महेश नारायण नाजरे (वय ५८, रा. फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश (१) पी. एफ. सय्यद यांनी तीन वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. बुधवारी (दि. २३) या खटल्याचा निकाल लागला. ९ फेब्रुवारी २०१९ मध्ये दुपारी सव्वाबाराच्या सुमारास नाजरे याच्या घरात हा गुन्हा घडला होता.सरकारी वकील ॲड. मंजूषा पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेश नाजरे हा शिक्षक असून, गुन्हा घडलेल्या दिवशी तो पीडित मुलीच्या घरी दहावीचे इतिहासाचे पुस्तक आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी मुलीच्या आईने पुस्तकाच्या झेरॉक्स काढून त्या नाजरे यांच्या घरी पोहोच करण्यास मुलीला सांगितले. त्यानुसार दुपारी सव्वाबाराच्या सुमारास मुलगी पुस्तकाच्या झेरॉक्स घेऊन नाजरे याच्या घरी गेली.

घरात मोबाइलवर बघत होता अश्लील चित्रफिती त्यावेळी तो घरात मोबाइलवर अश्लील चित्रफिती बघत होता. घरात दुसरे कोणी नसल्याचे पाहून त्याने मुलीशी अश्लील चाळे केले. तिला आतल्या खोलीत ओढून नेताना हिसडा देऊन पीडित मुलगी घरी पळून गेली. हा प्रकार घरात सांगताच तिच्या आईने करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरलीतत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक अरविंद कांबळे यांनी तपास करून नाजरे याच्यावर आरोपपत्र दाखल केले. ॲड. मंजूषा पाटील यांनी न्यायाधीशांसमोर ९ साक्षीदार तपासले. पीडित मुलीची आई, वडील, कॉलनीतील शेजारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सर्व साक्षी, पुरावे आणि ॲड. पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश सय्यद यांनी नाजरे यास दोषी ठरवून शिक्षा सुनावली.पॉक्सोंतर्गत शिक्षान्यायाधीशांनी आरोपी नाजरे याला बाललैंगिक प्रतिबंधक कायदा म्हणजेच पॉक्सोंतर्गत कलम ८ नुसार ३ वर्षे सक्तमजुरी, पाच हजार रुपये दंड आणि कलम १२ नुसार १ वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीTeacherशिक्षकCourtन्यायालय