शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."
2
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांची यादीच वाचली; जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला सुनावलं
3
"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने
4
"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप
5
"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली
6
सरकार स्थापन होताच 25 दिवस खास तरुणांसाठी! अखेरच्या रॅलीत काय-काय बोलले पंतप्रधान मोदी?
7
महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का
8
"नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली...", मनमोहन सिंग यांची पत्रातून टीका
9
दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे
10
जम्मूमध्ये पोलीस ठाण्यावर हल्ला; लष्कराच्या १६ जवानांवर गुन्हा दाखल
11
आरोग्य सांभाळा! 'या' लोकांसाठी AC ठरू शकतो घातक; फुफ्फुसांचं होईल मोठं नुकसान
12
आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 
13
"देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा
14
"जितेंद्र आव्हाड मनोविकृत, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा", मंत्री गुलाबराव पाटलांची मागणी
15
OYO ला आर्थिक वर्ष २४ मध्ये १०० कोटींचा निव्वळ नफा; पहिल्यांदाच नफ्यात आली कंपनी
16
"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...
17
“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
18
अरे देवा! नवऱ्याने रील बनवण्यास केली मनाई; नाराज झालेली बायको मुलीसह झाली फरार
19
Gautam Gambhir च्या विरोधात 'दादा'? गांगुलीचा BCCI ला सल्ला अन् चाहते बुचकळ्यात!
20
TATA चा 'हा' शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "१३५ पर्यंत येणार..."

शिक्षकाकडून दहावीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 1:39 PM

कोल्हापूर येथील प्रायव्हेट हायस्कूलमध्ये चेष्टामस्करीतून मित्राला शिवी दिल्याच्या रागातून दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांला शिक्षकाने बेदम मारहाण केली. आस्कीन सैफराज मुजावर (वय १५, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) असे जखमीचे नाव आहे. त्याचे पाठीवर मारहाणीचे वळ उठले आहेत. बुधवारी सकाळी संतप्त पालकांनी शाळेत येवून शिक्षक महादेव पंढरीनाथ देवस्थळे (६० रा. यश अपार्टमेंन्ट, मंगळवार पेठ) यांना जाब विचारत धारेवर धरले. त्यांना निलंबित करा, अन्यथा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करतो, अशी भूमिका पालकांनी घेतल्याने तणाव पसरला.

ठळक मुद्देशिक्षकाकडून दहावीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाणप्रायव्हेट हायस्कूल मधील प्रकार, संतप्त पालकांकडून शिक्षक धारेवर

कोल्हापूर : येथील प्रायव्हेट हायस्कूलमध्ये चेष्टामस्करीतून मित्राला शिवी दिल्याच्या रागातून दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांला शिक्षकाने बेदम मारहाण केली. आस्कीन सैफराज मुजावर (वय १५, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) असे जखमीचे नाव आहे. त्याचे पाठीवर मारहाणीचे वळ उठले आहेत. बुधवारी सकाळी संतप्त पालकांनी शाळेत येवून शिक्षक महादेव पंढरीनाथ देवस्थळे (६० रा. यश अपार्टमेंन्ट, मंगळवार पेठ) यांना जाब विचारत धारेवर धरले. त्यांना निलंबित करा, अन्यथा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करतो, अशी भूमिका पालकांनी घेतल्याने तणाव पसरला.आस्कीन मुजावर हा दहावी ‘ड’च्या वर्गात शिकतो. सोमवारी (दि. १) शाळेचा पहिला दिवस होता. सायंकाळी चारच्या सुमारास आस्कीन आणि त्याचा मित्र अथर्व  भोसले खेळत असताना चेष्टामस्करीमध्ये त्याने अथर्वला शिवी दिली. हे शिक्षक महादेव देवस्थळे यांना समजताच त्यांनी आस्कीनला व्हरांड्यातून ओढत आणून पंधरा मिनीटे सर्व मुलांच्या समोर बेदम मारहाण केली. तो ओरडत असतानाही थोडीदेखील दया दाखविली नाही. अमानुषपणे त्याला मारहाण केली. त्यांने घरी गेलेनंतर आई-वडीलांना हा प्रकार सांगितला.

दोन दिवस मुलाला त्रास होवू लागल्याने बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास मुलाचे आजोबा इकबाल, वडील सैफराज, आई नूजहत, सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल पार्टे, पप्पू शेख, मनिष सासणे, दिपक बोहीत हे शाळेत आले. त्यांनी मुखाध्यापक एम. आर. गोरे यांची भेट घेवून चांगलेच सुनावले. गोरे यांनी पालकांची समजूत घालत संस्थेचे सचिव व्ही. जे. देशपांडे यांचेशी चर्चा करुन शिक्षक देवस्थळे यांचेवर कारवाईचा निर्णय घेतो असे सांगितले.

देवस्थळे हे दोन महिन्यात सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांची पत्नी आजारी असल्याने खासगी रुग्णालयात दाखल आहे. मानसिक तणावाखाली त्यांनी विद्यार्थ्यांला मारहाण केली असावी. परंतु त्यांनी केलेली ही मारहाण अमानुष आहे अशी कबुलीही मुखाध्यापक गोरे यांनी दिली. राजवाडा पोलीसांनीही शाळेत भेट देवून माहिती घेतली.शिक्षकाने मागितली माफीमुखाध्यापकांच्या कक्षामध्ये शिक्षक देवस्थळे यांना बोलविण्यात आले. ते येताच पालकांनी चांगलेच धारेवर धरले. यावेळी भेंदरलेल्या देवस्थळे यांनी माझी चूक झाली आहे. मला माफ करा, अशी हातजोडून विनवणी केली. चुकीला माफी नाही, यांना शिक्षा झालीच पाहिजे. संस्थेने त्यांचे निलंबन करावे, अन्यथा आम्ही पोलीसांत तक्रार देतो असे सांगत सायंकाळी पाचपर्यंत निर्णय घ्या, असे पालकांनी सांगितले. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरTeacherशिक्षक