शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकानं विद्यार्थिनींसोबत केलं अक्षम्य कृत्य, शेळेवाडीच्या माध्यमिक शाळेतील प्रकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 22:42 IST

आज समुपदेशन करण्यासाठी आलेल्या समुपदेशक गीता हासुरकर यांनी मुलींना विश्वासात घेऊन माहिती घेताना हा धक्कादायक प्रकार समोर आला.

राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी येथील माध्यमिक शाळेत एका शिक्षकाने मुलींच्या असहाय्यतेचा फायदा घेत वाईट वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ते गेल्या दोन वर्षांपासून येथे कार्यरत होते. नववी आणि दहावी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना त्याने त्रास दिल्याचे समोर आले आहे. हा संपूर्ण प्रकार एक महिन्यापूर्वी घडला आहे. आज समुपदेशन करण्यासाठी आलेल्या समुपदेशक गीता हासुरकर यांनी मुलींना विश्वासात घेऊन माहिती घेताना हा धक्कादायक प्रकार समोर आला.

हा शिक्षक 9 वी आणि 10 वीच्या विद्यार्थिनींच्या खांद्यावर हात ठेवणे, खिशात हात घालणे असे गैरवर्तन करत होता. या शिक्षकाच्या कृत्याची चर्चा महिनाभरापासून ग्रामस्थांमध्ये होती. याबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे ग्रामस्थानी या संस्थेच्या कार्यालयात धाव घेतली. संस्थेने तत्काळ त्या शिक्षकाची बदली केली. त्यामुळे या घटनेबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. इंग्रजी विषय शिकवणारे ते शिक्षक आहेत.. संबंधित शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी संबंधित मुलींसह पालक आणि ग्रामस्थांमधून होत आहे.

गावातील शाळेत घडलेली घटना खरी आहे. याबाबत ग्रामस्थांनी संस्थेकडे तक्रार केली आहे. तसेच संबंधित शिक्षकावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली असल्याचे शेळेवाडीच्या सरपंच रिना पाटील यांनी सांगितले.

शिक्षकाची तात्काळ बदली -काही ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने संबंधीत शिक्षकाची बदली करून घडल्या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. संबंधित शिक्षकाची सध्या सातारा जिल्ह्यात बदली केली आहे, अशी माहिती पोलीस पाटील श्रीपती पाटील यांनी दिली.

 समुपदेशनातून प्रकार उघड -शेळेवाडी येथील घडलेला प्रकार समुपदेशनाच्या निमित्ताने आज समजला मुलींनी धाडसाने या प्रकारास वाचा फोडली. त्या शिक्षकाची बदली झाली असली तरी यापुढेही, असे प्रकार होऊ नयेत, असे मुलींनी म्हटले आहे. प्रत्यक्षात ज्ञानाचे धडे देणाऱ्या शिक्षकांनी गुड आणि बॅट टचचे महत्व समजावून देण्याऐवजी गैर कृत्य केल्यामुळे विकृती समोर आली आहे. याबद्दल संताप व्यक्त होत आहे. मुलींचे कौतूक केले पाहिजे की त्यांनी ग्रामीण भाग असूनही आपल्या बाबतीत घडलेला प्रकार समोर आणला मात्र त्याचा या शाळेच्या पटावर परिणाम होऊ नये, असे महिला समुपदेशक गीता हासुरकर यांनी म्हटले आहे.

संबंधीत घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शिक्षकांकडून झालेल्या या कृत्याबद्दल कडक कारवाईची मागणी होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTeacherशिक्षकStudentविद्यार्थी