क्रांतिकारक चिमासाहेब यांचे कार्य तरुण पिढीला देणे गरजेचे : रणजित गावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 12:19 PM2020-01-13T12:19:19+5:302020-01-13T12:20:27+5:30

ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्यलढा उभारणारे आद्य क्रांतिकारक चिमासाहेब महाराज यांच्या कार्याचा तरुण पिढीला परिचय करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन नक्कीच पुढाकार घेईल, असे प्रतिपादन बार असोसिएशचे अध्यक्ष अ‍ॅड. रणजित गावडे यांनी केले.

The task of the revolutionary Chimasaheb should be given to the younger generation: Ranjit Gawade | क्रांतिकारक चिमासाहेब यांचे कार्य तरुण पिढीला देणे गरजेचे : रणजित गावडे

 चिमासाहेब महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हुतात्मा क्रांती आणि कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

googlenewsNext
ठळक मुद्देक्रांतिकारक चिमासाहेब यांचे कार्य तरुण पिढीला देणे गरजेचे : रणजित गावडेचिमासाहेब जयंतीनिमित्त अभिवादन

कोल्हापूर : ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्यलढा उभारणारे आद्य क्रांतिकारक चिमासाहेब महाराज यांच्या कार्याचा तरुण पिढीला परिचय करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन नक्कीच पुढाकार घेईल, असे प्रतिपादन बार असोसिएशचे अध्यक्ष अ‍ॅड. रणजित गावडे यांनी केले.

क्रांतिकारक चिमासाहेब महाराज यांच्या १८९ व्या जयंतीदिनी हुतात्मा क्रांती सामाजिक संस्था आणि जिल्हा बार असोसिएशन यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात चिमासाहेब महाराज यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पद्माकर कापसे यांनी चिमासाहेब यांच्या क्रांतिकार्याचा उजाळा दिला.

संस्थेचे कार्याध्यक्ष रामेश्वर पत्की यांनी क्रांतिकारकांच्या आठवणी सांगितल्या. यावेळी बार असोसिएशनचे सचिव अ‍ॅड. गुरुप्रसाद माळकर यांनी चिमासाहेब यांच्यावर पुस्तिका प्रकाशन करण्यासाठी बार असोसिएशन सहकार्य करील, अशी ग्वाही दिली. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक किसनराव कल्याणकर, मुसाभाई शेख, राहुल चौधरी, सतीश पोवार, डॉ. गुरुदत्त म्हाडगुत, प्रशांत बरगे, अनिल कोळेकर, आदी उपस्थित होते.

 

 

Web Title: The task of the revolutionary Chimasaheb should be given to the younger generation: Ranjit Gawade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.