इचलकरंजी : परभणी येथे झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधान प्रतिकृतीची विटंबना झाली. तसेच पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. हा संतापजनक प्रकार असून या घटनेच्या निषेधार्थ आज, शुक्रवारी (दि २०) तारदाळ गाव बंदची हाक तारदाळ बौद्ध समाजाच्या वतीने देण्यात आली होती.या अनुषंगाने शुक्रवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या घटनेच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने करण्यात आली. तेथे प्रसाद खोबरे, सरपंच पल्लवी पोवार, यासीन मुजावर, नयन कांबळे, गौरव जाधव, सागर नाईक यांनी सदर घटनेचा निषेध व्यक्त केला. यावेळी गावभाग, दसरा चौक, ज्ञानेश्वर नगर, विठ्ठल मंदिर परिसर, चांदणी चौक, जावईवाडी या भागातून मोटर सायकल रॅली काढून गाव बंदचे आवाहन करण्यात आले. व्यापाऱ्यानी, विविध संस्थांनी व सर्व पक्षीय संघटनेने या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. परिसरात शहापूर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.
Kolhapur: परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ तारदाळ बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 11:29 IST