शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

Kolhapur: गडहिंग्लजला पाणी देताना पालिकेची दमछाक, देखभाल दुरुस्तीचा मेळ बसेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 16:13 IST

दृष्टिक्षेपात नळयोजना, पाणी पुरवठ्याचा लेखाजोखा.. जाणून घ्या

राम मगदूमगडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेची नळपाणी पुरवठा योजना तब्बल ४२ लाखांनी तोट्यात आहे. विशेष पाणीपट्टीतून मिळणारे उत्पन्न आणि कामगार पगार, देखभाल दुरुस्ती, जलशुद्धीकरण, वीजबिल इत्यादी खर्चाचा मेळ घालताना प्रशासनाची दमछाक होत आहे. त्यामुळे शहरवासीयांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे.आजमितीस शहराची लोकसंख्या सुमारे ३५ हजार आहे. शहरात शिकायला येणारे विद्यार्थी आणि प्रवासी मिळून सुमारे ५० हजार लोकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नगरपालिकेला करावी लागते. त्यासाठी हिरण्यकेशी नदीवर आधारित नळपाणी पुरवठा योजना राबविण्यात आली आहे. दररोज माणसी १२० लिटर पाणीपुरवठा केला जातो. मीटर पद्धतीने पाणीपट्टी आकारली जाते. पहिल्या ७५ युनिटला घरगुती वापरासाठी केवळ २४० रूपये तर वाणिज्य वापरासाठी १०५० रूपये इतकी आकारणी केली जाते. (१ युनीट म्हणजे १००० लिटर पाणी)सध्या वाढीव हद्दीतील उपनगरांसह शहरातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी देण्यासाठी सुमारे ४७ लाखांच्या नव्या नळयोजनेचे काम गतीने सुरू आहे. पाणीपुरवठा ही अत्यावश्यक सेवा असली तरी त्यावरील खर्चावर आणि सांडपाण्याच्या व्यवस्थापनावरील नियंत्रणासाठी नागरिकांनीच पुढे येण्याची आवश्यकता आहे.

दृष्टिक्षेपात नळयोजना

  • शहराची लोकसंख्या : ३५८८४
  • घरगुती नळजोडण्या : ८७३९
  • वाणिज्य नळजोडण्या : २९०

पाणी पुरवठ्याचा लेखाजोखा २०२३-२४

  • मालमत्ताकराच्या उत्पन्नापैकी १५ टक्के : ७८,२५,२९९
  • विशेष पाणीपट्टीद्वारे जमा रक्कम : १,२७,३२,२४६
  • नवीन नळजोडणीची जमा रक्कम : ५०,५००
  • कामगार पगार, निवृत्तीवेतन, अंशदान इत्यादी : ३२,२०,४५९
  • देखभाल दुरुस्ती खर्च : ६९,५७,८४३
  • जलशुद्धीकरणासाठी रसायने, तुरटी, टीसीएल खरेदी : २,९४,४००
  • वीजबिलाचा खर्च : १,२३,६९,८३५
  • पाटबंधारेकडून घेतल्या जाणाऱ्या पाण्याची रक्कम : १९,९०,७७९
  • एकूण उत्पन्न : २,०६,०८,०४५
  • एकूण खर्च : २,४८,३३,३१६
  • एकूण तोटा : ४२,२५,२७१

अत्यावश्यक सेवा म्हणून नफ्या-तोट्याचा विचार न करता नळपाणी पुरवठा योजना राबवली जाते. नदीतून पाण्याचा उपसा, शुद्धीकरण व देखभाल दुरुस्तीसाठी खूप खर्च येतो. त्यामुळे शुद्ध केलेल्या पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठीच करावा, शुद्ध पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची नागरिकांनी काळजी घ्यावी.- अनिल गंदमवाड, पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी