झाडे जगविण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:25 IST2020-12-31T04:25:38+5:302020-12-31T04:25:38+5:30

कोल्हापूर : शेंडा पार्कातील आगीची झळ पोहोचलेली झाडे जगविण्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून बुधवारी डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपकडून टँकरद्वारे ...

Tanker water supply started to keep the trees alive | झाडे जगविण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू

झाडे जगविण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू

कोल्हापूर : शेंडा पार्कातील आगीची झळ पोहोचलेली झाडे जगविण्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून बुधवारी डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपकडून टँकरद्वारे झाडांना पाणी देण्याची सुरुवात झाली. आमदार ऋतुराज पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

शेंडा पार्कातील आगीत सुमारे २५ हजार झाडांना झळ पोहोचली असून, लहान सुमारे तीन हजार झाडे पूर्णपणे जळाली. उर्वरित झाडांना जर पाणी दिले, तर ती झाडे जगू शकतात, असे मंगळवारी त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर निदर्शनास आले होते. त्याचवेळी त्यांनी डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपकडून टँकर उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार हे काम सुरू झाले आहे. नववर्षाचा संकल्प करूया, चला वनराई जपूया, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे.

३०१२२०२०-कोल-शेंडा पार्क

आमदार ऋतुराज पाटील यांच्या पुढाकारातून कोल्हापुरातील शेंडा पार्क परिसरातील आगीमुळे नुकसान झालेल्या झाडांना बुधवारपासून टँकरद्वारे पाणी देण्यास सुरुवात झाली.

Web Title: Tanker water supply started to keep the trees alive