तमाशा कलावंत बेबीताई कोल्हापूरकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 18:18 IST2022-02-17T18:17:45+5:302022-02-17T18:18:15+5:30

तमाशा मंडळ नावाने महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेल्या तमाशाच्या बेबीताई संचालक होत्या.

Tamasha artiste Babytai Kolhapurkar today passed away | तमाशा कलावंत बेबीताई कोल्हापूरकर यांचे निधन

तमाशा कलावंत बेबीताई कोल्हापूरकर यांचे निधन

श्रीरामपूर : येथील तमाशा कलावंत व चित्रपट कलाकार बेबीताई कोल्हापूरकर यांचे निधन झाले. राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या, चित्रपट नृत्यदिग्दर्शिका लक्ष्मीबाई कोल्हापूरकर यांच्या त्या भगिनी होत्या. तमाशा मंडळ नावाने महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेल्या तमाशाच्या बेबीताई संचालक होत्या.

सुधारलेल्या बायका, मानाचा मुजरा, शाहीर पठ्ठे बापुराव आदी गाजलेल्या मराठी चित्रपटामध्ये तसेच ख्यातनम दिग्दर्शक जब्बार पटेल दिग्दर्शित एक होता विदुषक या चित्रपटातील कलाकारांच्या वेषभूषा, केशभूषा बेबीताईंनी केली होती. हे काम उल्लेखनीय होते.

Web Title: Tamasha artiste Babytai Kolhapurkar today passed away