शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

तळगाव ग्रामस्थ करणार रस्त्यासाठी उपोषण, लोकप्रतिनिधीला फिरू देणार नसल्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 15:27 IST

Road Kolhapur :  बुरंबाळी फाटा ते दुर्गमानवाड या रस्त्याला जोडणारा तळगाव - कुदळवाडी रस्ता येत्या महिन्याभरात खड्डेमुक्त न केल्यास गावात कोणत्याही लोकप्रतिनिधीला फिरू देणार नसल्याचा इशारा आज येथील तरुणांनी दिला. रस्त्याबद्दलच्या भावना तीव्र शब्दात व्यक्त करत तरुणांनी  लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक आमच्या ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला.

ठळक मुद्देरस्ता महिन्याभरात खड्डेमुक्त न केल्यास लोकप्रतिनिधीला फिरू देणार नाहीरस्ता खड्डेमुक्त न झाल्यास बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा 

श्रीकांत ऱ्हायकरधामोड/कोल्हापूर :  बुरंबाळी फाटा ते दुर्गमानवाड या रस्त्याला जोडणारा तळगाव - कुदळवाडी रस्ता येत्या महिन्याभरात खड्डेमुक्त न केल्यास गावात कोणत्याही लोकप्रतिनिधीला फिरू देणार नसल्याचा इशारा आज येथील तरुणांनी दिला. रस्त्याबद्दलच्या भावना तीव्र शब्दात व्यक्त करत तरुणांनी  लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक आमच्या ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. हा रस्ता म्हणजे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे हेच कळेना असे झाल्याची प्रतिक्रिया नोंदवत तरुणांनी रस्ता खड्डेमुक्त न झाल्यास बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा  प्रशासनाला दिला आहे.बुरंबाळी दुर्गमानवाड रस्त्यापासून दोन किलोमीटर अंतरावर असणारे तळगाव अत्यंत ग्रामीण व दुर्गम गाव. गेल्या कित्येक वर्षापासून या गावाला रस्ताच झालेला नाही. एकदा डांबरीकरण झालेले आहे. पण या रस्त्याची दयनीय अवस्था पाहून या रस्त्या डांबरीकरण झालेले आहे का असा प्रश्न पडतो.

२०१८-१९ रोजी गावातील अंतर्गत रस्त्याचा सात लाख पन्नास हजार रुपयाचा निधी मुख्य रस्त्यावरती वळवत ग्रामपंचायतीने स्वतःहून या रस्त्याची डागडुजी केली होती. पण तोही रस्ता गुणवत्ते अभावी कुचकामी ठरला. अवघ्या वर्षातच त्याच्यावरचे डांबर बाजूला गेले आहे. आमदार फंडातून २०१९ रोजी या रस्त्यावरती नऊ लाख नव्व्यानव हजार रुपये खर्च केल्याचा रस्त्यावरती लावलेला बोर्ड सांगतो. पण या रस्त्याकडे बघितले असता खरंच हा निधी या रस्त्यावर खर्च झाला आहे का? असा प्रश्न पडतो.  पावसाळ्याचे दिवस सुरू होतील, तेव्हा या रस्त्याची अजून दयनीय अवस्था होईल.

या मार्गावर एकच बस ये-जा करत असते. पण रस्त्याची अवस्था फार दयनीय झाल्याने एसटीच्या फेऱ्याही बंद झाल्या आहेत . त्यामुळे संतप्त झालेल्या गावातील सर्व तरुण मंडळाच्या तरुणांनी एकत्र येऊन आज रस्त्यावर आंदोलन केले. येत्या महिनाभरात या रस्त्याची डागडुजी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे इशारा या तरुणांनी आज दिला.

यावेळी संजय तवनकर, विठ्ठल पाटील, मारुती पाटील, रमेश कांबळे, सुनील पाटील,शशांक पाटील, साताप्पा नाळे, धनाजी पाटील,सतीश पाटील, युवराज पाटील, किरण पाटील, आदींसह गावातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते .