बांधकाम कामगारांसाठी रस्त्यावर उतरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:14 IST2021-03-30T04:14:39+5:302021-03-30T04:14:39+5:30

ते हळदी (ता. करवीर) येथे स्वराज्य जनरल कामगार सेनेच्या वतीने आयोजित बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्डवाटप व नूतन ग्रामपंचायत सदस्यांच्या ...

Take to the streets for construction workers | बांधकाम कामगारांसाठी रस्त्यावर उतरू

बांधकाम कामगारांसाठी रस्त्यावर उतरू

ते हळदी (ता. करवीर) येथे स्वराज्य जनरल कामगार सेनेच्या वतीने आयोजित बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्डवाटप व नूतन ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार समारंभप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी भोगावती साखर कारखान्याचे संचालक प्रा. शिवाजीराव पाटील होते.

श्री. पवार पुढे म्हणाले, काही अधिकारी कामगारांची अडवणूक करून त्यांना त्रास देत असतात, अशा अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी संघटनात्मक शक्ती मोठे योगदान देत असते.

प्रा. शिवाजीराव पाटील म्हणाले, कामगार व शेतकऱ्यांचे हात थांबले तर देश थांबेल एवढी मोठी जबाबदारी या दोन्ही यंत्रणा पार पडत आहेत. कामगारांच्या अडचणी वेळी संघटनांनी दिलेली साथ त्यांना मोठा आधार ठरते.

यावेळी देवाळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संजय धुमाळ यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

सूत्रसंचालन दयानंद कांबळे यांनी, तर प्रास्ताविक संजय धुमाळ यांनी केले. यावेळी जोतीराम मोरे, तानाजी तावडे, मच्छिंद्र कांबळे, संजय सुतार यांनी मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमास रझाक अत्तार, प्रशांत कांबळे, के.पी. पाटील, संजय जाधव, डी.जी. पाटील, सर्जेराव पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Take to the streets for construction workers