शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगा प्रदुषण रोखण्यास उपाययोजना करा, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे कोल्हापूर महापालिकेला निर्देश

By भारत चव्हाण | Updated: September 20, 2023 19:21 IST

जयंती नाला बंधाऱ्यावरून सांडपाणी नाल्याद्वारे पंचगंगा नदीमध्ये मिसळत असल्याचे आढळून आले

कोल्हापूर : जयंती नाला बंधाऱ्यावरून सांडपाणी पंचगंगा नदीत विनाप्रक्रिया जाणार नाही याची दक्षता घ्यावी, चार एमएलडी व  सहा एमएलडी सांडपाणी प्रक्रिया संयंत्रणा त्वरित चालू करावी तसेच शहरातील सर्व नाले आडवून ते सांडपाणी प्रक्रिया संयंत्रणेकडे नेऊन त्यावर योग्य प्रक्रिया करण्यात यावी, असे निर्देश महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रादेशिक अधिकारी ज.शं. साळुंखे यांनी महानगरपालिकेला बुधवारी दिले. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दि. १५ सप्टेबर रोजी जयंती नाला ओव्हरफ्लो होत असताना प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली होती. जयंती नाला बंधाऱ्यावरून सांडपाणी नाल्याद्वारे पंचगंगा नदीमध्ये मिसळत असल्याचे आढळून आले  होते. त्याचबरोबर गेली २ वर्षे आपणाकडून ४ एमएलडी व ६ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया संयंत्रणा प्रकल्प चालू करणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगितले जात आहे. पण प्रत्यक्षात दोन्ही सांडपाणी प्रक्रिया संयंत्रणा प्रकल्प सुरु करण्यात आलेले नाहीत. शहरातील विविध १२ नाल्यापैकी पाच नाले अद्यापही आडवलेले नाहीत. या नाल्याद्वारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीने घरगुती सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळत आहे. त्यामुळे प्रदुषण नियंत्रण मंडळाने हे निर्देश दिले आहेत. याबाबत आक्षेप असतील तसेच काही म्हणणे असेल तर निर्देश प्राप्त झाल्यानंतर सात दिवसाच्या आत नोंदवावे, अन्यथा आपल्या विरुध्द पर्यावरण कायद्याअंतर्गत पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही साळुंखे यांनी म्हटले आहे. येथील प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांच्या दूरध्वनीद्वारे प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने हे निर्देश देण्यात  आले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेळोवेळी महानगरपालिका प्रशासनाला जल प्रदूषण प्रतिबंध विषयक विविध निर्देश जारी केले आहेत. प्रामुख्याने शहरात निर्माण होत असलेल्या सांडपाण्याची प्रक्रिया आणि विल्हेवाट लावण्यासाठी दीर्घकालीन आणि अल्पकालीन उपाययोजना अंमलात आणण्याचे यापूर्वीही निर्देश दिले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरpollutionप्रदूषणriverनदी