शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

‘पंचगंगा’ प्रदूषित करणाऱ्यांवर थेट कारवाई करा, पर्यावरण मंत्र्यांचे प्रदूषण मंडळाला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 13:12 IST

कोल्हापूर : पंचगंगेचे पाणी प्रदूषित झाल्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच पसरला आहे. याबाबत बुधवारी पर्यावरण मंत्री आदित्य ...

कोल्हापूर : पंचगंगेचे पाणी प्रदूषित झाल्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच पसरला आहे. याबाबत बुधवारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीत झाडाझडती घेतली. पंचगंगा प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या घटकांवर थेट कारवाई करण्याचे आदेश मंत्री ठाकरे यांनी प्रदूषण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत.पंचगंगा प्रदूषणाचा विषय नवीन नाही, दरवर्षी उन्हाळ्यात प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनतो. कोल्हापूर महापालिकेसह नदीकाठची गावे, कारखान्याचे दूषित पाणी थेट नदीत मिसळते आणि त्यातून पंचगंगा प्रदूषित होते. गेली चार-पाच दिवस पंचगंगेत मृत माशांचा अक्षरश: खच पडला आहे. मृत मासे रुई बंधाऱ्यापर्यंत वाहत गेले आहेत. परिणामी नदीकाठावरील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत कोल्हापुरातील सामाजिक संघटनांनी प्रदूषण मंडळाला धारेवर धरल्यानंतर यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यानंतर कोल्हापूर प्रादेशिक कार्यालयाने संबंधित घटकांना नोटिसा पाठवल्या आहेत.

याबाबत, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली. यामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी, जिल्ह्यातील ३९ गावांचे सांडपाणी थेट पंचगंगेत मिसळते यासाठी बारा ठिकाणी क्लस्टर केले असून प्रक्रिया प्रकल्प उभे करण्यासाठी पैशांची गरज असल्याचे सांगितले.

कोल्हापूर महापालिकेने सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभी केली आहेत, मात्र त्याची क्षमता वाढविण्याची गरज असून त्यासाठी निधी हवा असल्याचे आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी सांगितले, पंचगंगा प्रदूषणाचा विषय गंभीर असून प्रादेशिक कार्यालयाने पाठविलेल्या अहवालानुसार संबंधित घटकांवर कारवाई करण्याचे आदेश मंत्री ठाकरे यांनी बैठकीत दिले. बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रेखावार, प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी रवींद्र आंधळे, प्रमोद माने आदी उपस्थित होते.

पंचगंगा प्रदूषणाचा विषय मंत्रिमहोदयांनी गांभीर्याने घेतलेला निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे. नुसत्या कारवाईने विषय संपणार नाही, मासे ही सार्वजनिक मालमत्ता असून सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध कायद्यानुसार संबंधितांवर गुन्हे दाखल केले पाहिजेत. - बाबा इंदुलकर (कॉमन मॅन संघटना)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषणAditya Thackreyआदित्य ठाकरे