शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याचं ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बँटींग, दुसरी बँटींग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
4
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
5
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
6
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
7
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
8
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
9
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
10
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
11
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
12
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
13
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
14
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
15
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
16
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
17
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
18
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
19
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
20
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 

वामकुक्षी घेऊन कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसणार चाप, सीसीटीव्ही कॅमेरे ठेवणार नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 10:59 AM

आयुक्त अभिजित चौधरी यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीतील सर्व विभागात ६९ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले; त्यामुळे वामकुक्षी घेऊन कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप बसणार आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर महानगरपालिकेतील फिरस्त्यांना खुर्चीवर बसावे लागणारसर्व विभागात बसविले सीसीटीव्ही कॅमेरे

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांना घरातून दुपारचे जेवण आणि तासाभराची झोप घेऊन येण्याची सवय झाली आहे; त्यामुळे दुपारी दीड वाजल्यापासून सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत अनेक विभाग कर्मचाऱ्यांविना रिकामे असतात. याची गंभीर दखल घेऊन आयुक्त अभिजित चौधरी यांनी मुख्य इमारतीतील सर्व विभागात मिळून ६९ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले; त्यामुळे अनेक फिरस्त्यांना आता यापुढे खुर्चीवर बसूनच काम करावे लागण्याची वेळ आली आहे.महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामाची वेळ सकाळी दहा ते सायंकाळी सहा अशी आहे; पण अनेक कर्मचारी सकाळी अकरापर्यंत हलत डुलत यायचे. ही बाब लक्षात येताच तत्कालीन आयुक्त पी. शिवशंकर यांनी बायोमेट्रीक हजेरी पद्धत अंमलात आणली.

मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ही बायोमेट्रीक हजेरी यंत्रे बसविली. नंतर त्यात फेस रिडिंगचाही समावेश करण्यात आला; त्यामुळे कर्मचाऱ्यांचे सकाळी वेळेवर कार्यालयात येणे बंधनकारक झाले.

तरीही त्यातून अनेक कर्मचाऱ्यांनी पर्याय शोधून बाहेर पडायचे मार्ग चोखाळले. बायोमेट्रीक हजेरी देऊन एकदा आत आल्यानंतर सरळ सायंकाळी सहा नंतरच तेथे जाऊन आऊट करीत होते. इतरवेळी मात्र आत - बाहेर करताना कर्मचारी त्याची नोंद करीत नव्हते.सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत कार्यालयात बसून कामकाज करणे, नागरिकांच्या समस्या सोडविणे कर्मचाऱ्यांना बंधनकारक आहे. दुपारी दीड ते दोन ही वेळ जेवणाची असते. त्याही वेळेत कार्यालय सोडायचे नाही, अशी अट आहे. तरीही अनेक कर्मचारी व अधिकारी विविध कारणांनी केव्हाही कोठेही जात असतात, असे निदर्शनास आले.

अधिकारी गेले की त्यांच्या हाताखालील कर्मचारी, पदाधिकारी गेले की त्यांच्या कार्यालयातील कर्मचारीही घरी जातात. जेवण, दुपारची वामकुक्षी घेऊनच साडेचार वाजता परत कार्यालयात येतात; त्यामुळे नागरिकांच्या कामांचा खोळंबा होतो. नागरिकांना एकतर तिष्ठत राहावे लागते किंवा पुन्हा-पुन्हा फेऱ्या माराव्या लागतात.आयुक्त चौधरी यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी सर्व विभागात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी ६९ कॅमरे बसविण्यात आले. आयुक्तांच्या कार्यालयात देखिल एक कॅमेरा बसविला आहे.सर्व विभागावर कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आयुक्त कार्यालयाचा नियंत्रण राहणार आहे. कारण स्वत: आयुक्त त्यांच्या कार्यालयात बसून कोण काय करतो, कोण कुठे गेला, हे पाहू शकणार आहेत. तसेच या कॅमेऱ्याच्या माध्यमातून रेकर्ॉडिंगही होणार आहे. सलग २५ दिवसांचे रेकर्ॉडिंग डाटा सेव केला जाईल; त्यामुळे दुपारी घरी जेवायला जाणे आणि वामकुक्षी घेऊन कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप बसणार आहे. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाcctvसीसीटीव्हीkolhapurकोल्हापूर