बेळगाव मनपा निवडणूक बॅलेट पेपरवर पुन्हा घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:29 AM2021-09-10T04:29:36+5:302021-09-10T04:29:36+5:30

बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचीचे उल्लंघन करणारी आहे. लोकशाहीचे अधिकार हिरावून घेणारी ही संपूर्ण निवडणूक ...

Take Belgaum Municipal Election ballot paper again | बेळगाव मनपा निवडणूक बॅलेट पेपरवर पुन्हा घ्या

बेळगाव मनपा निवडणूक बॅलेट पेपरवर पुन्हा घ्या

Next

बेळगाव :

बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचीचे उल्लंघन करणारी आहे. लोकशाहीचे अधिकार हिरावून घेणारी ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करून व्हीव्हीपॅट मशीन अथवा बॅलेट पेपरद्वारे पुन्हा निवडणूक घेतली जावी, अशी मागणी पराभूत उमेदवार व काही मतदारांनी केली आहे.

लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवत घेतलेली बेळगाव महापालिकेची निवडणूक रद्दबातल करावी, अशी मागणी करत गुरुवारी मुख्य निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन सादर केले.

बेळगाव महापालिकेची निवडणूक पारदर्शी झाली नसल्याचा आरोप पराभूत उमेदवारांनी केला आहे. निवडणूक प्रक्रिया खूप कमी वेळात पार पडली गेली. सर्वोच्च न्यायालयाच्या २०१३च्या निकालानुसार जर निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन वापरात असेल तर त्याला व्हीव्हीपॅट मशीन जोडणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, महापालिका निवडणुकीत ते मशीन जोडण्यात आली नव्हती. यासंदर्भात ३१ ऑगस्ट रोजी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना कल्पना दिली होती. तरी त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. याखेरीज शेकडो मतदारांची नावे मतदार यादीतून गहाळ झाली आहेत. स्थानिक नसलेल्या, तसेच मृत व्यक्तींच्या नावे मतदान झाले आहे. काही प्रभागांमध्ये महापालिका क्षेत्राबाहेरील ग्रामपंचायत व्याप्तीतील मतदारांनी मतदान केले. एकंदर ही निवडणूक पारदर्शी झालेले नाही. तेव्हा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी करून निवडणूक प्रक्रियेतील ज्या त्रुटी दाखवून देण्यात आल्या त्यांचे स्पष्टीकरण द्यावे, तसेच निवडणूक प्रक्रियेतील त्रुटी रास्त असतील तर ही निवडणूक रद्दबादल करून पुनश्च निवडणूक घ्यावी आणि तोपर्यंत नव्या सभागृहाच्या सर्व प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

फोटो- बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनपा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनी निदर्शने केली.

०९ बेळगाव निवडणूक निदर्शने

Web Title: Take Belgaum Municipal Election ballot paper again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.