ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करा ---: दौलत देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 11:02 AM2019-11-19T11:02:14+5:302019-11-19T11:04:50+5:30

फार्मासिस्ट उपलब्ध नसणाºया दुकानांचे परवाने निलंबित करावेत, तसेच मनमानी पद्धतीने शालेय शुल्क आकारणी करणा-या शाळांवरही शिक्षण विभागाने नियंत्रण ठेवावे. रणजित प्रताप पाटील या विद्यार्थ्याच्या तक्रारीबाबत शिक्षण विभागाने दोन दिवसांत वस्तुस्थितीचा अहवाल सादर करावा.

Take action on hiring fraudsters | ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करा ---: दौलत देसाई

कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक झाली.

Next
ठळक मुद्दे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद बैठकीत आदेश

कोल्हापूर : मीटरप्रमाणे भाडे न आकारता ग्राहकांची फसवणूक करणा-या व ग्राहकांशी उद्धट वर्तन करणाºया रिक्षाचालकांवर पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करावी, असे आदेश सोमवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, मोटार वाहन निरीक्षक सुभाष देसाई, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुशांत रेवडेकर, जिल्हा अग्रणी प्रबंधक राहुल माने, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त ना. स. जवंजाल-पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डी. सी. कुंभार, उप शिक्षणाधिकारी बी. एम. किल्लेदार, अरुण यादव, प्रशांत पुजारी, अ‍ॅड. सुप्रिया दळवी, डॉ. शशिकांत डोईजड उपस्थित होते.

यावेळी जगन्नाथ जोशी यांंनी शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाशेजारील रिक्षाथांब्यावर रिक्षाचालकांकडून जवळच्या अंतरावरील भाडे नाकारले जाते. मीटरप्रमाणे भाडे आकारणी न करता ठोक भाडे तसेच प्रवासी ग्राहकांना उद्धट व अरेरावीची भाषा केली जाते, अशी तक्रार केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील अशा रिक्षाचालकांना शिस्त लावा, रिक्षाचालकांच्या मीटरची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करा, हा विषय प्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलीस विभागाने गंभीरतेने घ्यावा, असे आदेश दिले.

तसेच जादा दराने गॅस सिलिंडरचे वाटप करणाºया वितरकांवरही कारवाई करावी. गॅस वितरण करणा-या वाहनावर सिलिंडर दराचा फलक लावावा. त्याचबरोबर प्रत्येक महिन्याला बदलणाºया दराची प्रसिद्धी करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यातील औषध दुकानांची तपासणी करावी. फार्मासिस्ट उपलब्ध नसणाºया दुकानांचे परवाने निलंबित करावेत, तसेच मनमानी पद्धतीने शालेय शुल्क आकारणी करणा-या शाळांवरही शिक्षण विभागाने नियंत्रण ठेवावे. रणजित प्रताप पाटील या विद्यार्थ्याच्या तक्रारीबाबत शिक्षण विभागाने दोन दिवसांत वस्तुस्थितीचा अहवाल सादर करावा.

ग्राहकांना योग्य सुविधा मिळावी यासाठी सर्व विभागाने प्रयत्नशील राहावे, त्यांच्या तक्रारींचे संबंधित विभागाने त्वरित निराकरण करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्हा पुरवठा अधिकारी कवितके यांनी विषय वाचन केले. जिल्हा ग्राहक संरक्षण पंचायत समितीचे सदस्य तानाजी पाटील यांनी ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी एसटी स्मार्ट कार्ड लुबाडणीबाबत तक्रार दाखल केली. अरुण यादव यांनी शहरामध्ये ठिकठिकाणी महिला व पुरुष यांच्यासाठी प्रसाधनगृहे निर्माण करण्याबाबत तक्रार मांडली. यावेळी जिल्हाधिका-यांनी सार्वजनिक ठिकाणी असणाºया प्रसाधनगृहांची माहिती अधिसूचित करून प्रसिद्धी देणे व विशाळगड येथे महिलांकरिता प्रसाधनगृह उपलब्ध करून देण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्देश दिले.


 

 

Web Title: Take action on hiring fraudsters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.