शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

समरजित घाटगेंवर कारवाई करा, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा कागल पोलीस ठाण्यावर मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 13:53 IST

कागल : भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे हे राजर्षी शाहुंच्या विचारांच्या विपरीत कृती करीत आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाच्या ...

कागल : भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे हे राजर्षी शाहुंच्या विचारांच्या विपरीत कृती करीत आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाच्या तारखेवरून संभ्रम तयार करून जातीय तेढ निर्माण करीत आहेत. ऐतिहासिक राम मंदिरात राजकीय कार्यक्रम, साहित्य पदार्थ  विक्रीचे स्टॉल सुरू करून प्रभु श्रीरामांची विटंबना करीत आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी आज, सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कागल पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यावेळी घाटगे यांच्याविरोधात तक्रारही दिली.येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ एकत्र येत मुख्य मार्गावरून हा मोर्चा कागल पोलीस ठाण्या जवळ आल्यावर तो पोलिसांनी अडविला. प्रमुख कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांची भेट घेऊन तक्रार दिली. जिल्हा बॅकेचे संचालक भैय्या माने प्रकाश गाडेकर, प्रविण काळबर देवानंद पाटील यांची भाषणे झाली. युवराज पाटील, शशिकांत खोत, प्रविण भोसले, मनोज फराकटे, अजित कांबळे बळवंतराव माने  संजय फराकटे, अमित पिष्टे पदमजा भालबर आदी मान्यवर उपस्थित होते.मुश्रीफांचा वाढदिवस रामनवमी दिवसी नसल्याचा पुरावाग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त गोकुळ दुध संघाकडून देण्यात आलेल्या जाहीरातीवरुन हा वाद उफाळून आला. या जाहिरातीत प्रभु श्रीरामांचा एकेरी उल्लेख झाल्याने भाजप कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. याप्रकरणी मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी शुक्रवारी (दि.१५) कागल पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा काढला. यावेळी त्यांनी मुश्रीफ हे जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप करत त्यांचा वाढदिवस रामनवमी दिवसी नसल्याचा पुरावा देखील दिले आहेत.समरजित घाटगेंचा स्टंटयावरसर्व घडामोडीवर मंत्री मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया देताना माझ्या वाढदिवसाला कार्यकर्ते जाहीराती देतात. त्यामुळे समरजित घाटगे माझ्या विरोधात तक्रार दाखल करून फक्त स्टंट करीत आहेत असे म्हणाले होते. कागल ही राजर्षी शाहूची नगरी आहे. अशा जातीयवादी प्रवृत्तीला कागलची जनता योग्य जागा दाखवेल असेही म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगेNCPराष्ट्रवादी काँग्रेस