महापालिका सभा लॉकडाऊनमुळे तहकूब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 22:48 IST2020-07-20T22:34:11+5:302020-07-20T22:48:58+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात सात दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे सोमवारी आयोजित करण्यात आलेली महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा अचानक तहकूब करावी लागली. महापौर निलोफर आजरेकर यांनी सभागृहात येऊन तसे जाहीर केले.

महापालिका सभा लॉकडाऊनमुळे तहकूब
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सात दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे सोमवारी आयोजित करण्यात आलेली महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा अचानक तहकूब करावी लागली. महापौर निलोफर आजरेकर यांनी सभागृहात येऊन तसे जाहीर केले.
शहरात लॉकडाऊन उठविल्यामुळे महापौर आजरेकर यांनी सोमवारी सर्वसाधारण सभा आयोजित केली होती, परंतु शुक्रवारी सायंकाळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी सर्व आमदार, खासदार, तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते यांच्याशी ऑनलाईन संवाद साधून सर्वांची मते जाणून घेतली होती.
त्यानंतर त्यांनी जिल्ह्यात सात दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे सोमवारची सभाच तहकूब करावी लागली. ही सभा देखील काही मोजके प्रमुख पदाधिकारी सभागृहात उपस्थित ठेऊन बाकीचे सदस्य ऑनलाईन सभेच्या कामकाजात भाग घेणार होते.