शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

दारूचा महापूर रोखण्यासाठी पाच जिल्ह्यांत यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 3:59 PM

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारूचा महापूर वाहण्याची दाट शक्यता आहे. छुप्या मार्गाने दारू आणण्यासाठी उमेदवारांच्या पंटरांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे; परंतु हा महापूर रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांच्या सीमांवर (बॉर्डर) करडी नजर ठेवत ३५० अधिकारी व कर्मचाऱ्यांची यंत्रणा सज्ज ठेवली आहे, अशी माहिती विभागीय उपायुक्त यशवंत पोवार यांनी दिली.

ठळक मुद्देदारूचा महापूर रोखण्यासाठी पाच जिल्ह्यांत यंत्रणा सज्ज३५० कर्मचारी तैनात : विभागीय उपायुक्त यशवंत पोवार यांची माहिती

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारूचा महापूर वाहण्याची दाट शक्यता आहे. छुप्या मार्गाने दारू आणण्यासाठी उमेदवारांच्या पंटरांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे; परंतु हा महापूर रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांच्या सीमांवर (बॉर्डर) करडी नजर ठेवत ३५० अधिकारी व कर्मचाऱ्यांची यंत्रणा सज्ज ठेवली आहे, अशी माहिती विभागीय उपायुक्त यशवंत पोवार यांनी दिली.विधानसभेचे वारे तापू लागले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रात दारूची मोठ्या प्रमाणात उलाढाल होऊ लागली आहे. गोव्याहून विदेशी दारू छुप्या मार्गाने वाहतूक करून उमेदवारांच्या पंटरांनी गल्लीबोळांत, गावागावांत दारूचे बॉक्स पोहोच करण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे.

ग्रामीण भागातील गटा-तटांच्या राजकारणामुळे ठिकठिकाणी तणाव निर्माण होत आहेत. त्यातच कार्यकर्ते दारू पिऊन वावरत असल्याने वादावादीचे प्रसंग घडत असतात. लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी झाली होती.

विधानसभा निवडणूक चुरशीची होत असल्याने दारूचा महापूर मोठ्या प्रमाणात वाहण्याची शक्यता असल्याने ती रोखण्याचे मोठे आव्हान राज्य उत्पादन शुल्क विभागासमोर आहे. गोव्याहून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होण्याची शक्यता असल्याने तिलारी, गगनबावडा, दाजीपूर, हिरणी, आजरा हे पाच तपासणी नाके सील केले आहेत.

*वाहनांची कसून तपासणी*गोव्याहून येणाऱ्या चंदगड-आंबोली, कर्नाटक-कागल, राधानगरी-फोंडा आणि गगनबावडा या चार मार्गांवरून विदेशी दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असते. गोव्यामध्ये दारूचे दर कमी असल्याने महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांतील पंटरांचा या ठिकाणांहून ट्रक भरून मद्यसाठा आणण्याचा इरादा आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाकडून वाहनांची, विशेषत: प्रवासी एस. टी. बस, ट्रॅव्हल्स गाड्या व खासगी वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.

 

टॅग्स :liquor banदारूबंदीkolhapurकोल्हापूर