मीनाकुमारी युगाचा सुगंध दरवळला
By Admin | Updated: April 2, 2016 00:26 IST2016-04-02T00:20:20+5:302016-04-02T00:26:22+5:30
‘एक थी पाकिजा...’ : ‘लोकमत सखी मंच’ व ‘हृदयस्पर्श’तर्फे आयोजन; अलोट गर्दी

मीनाकुमारी युगाचा सुगंध दरवळला
कोल्हापूर : ‘चलते चलते, यूॅँही कोई मिल गया था...’, ‘अजीब दास्तॉँ है ये, कहॉँ शुरू कहॉँ खतम...’ ‘चलो दिलदार चलो, चॉँद के पार चलो..’ यासारख्या विविध सदाबहार गीत-संगीताच्या सादरीकरणाद्वारे मीनाकुमारी युगाचा सुगंध गुरुवारी (दि. ३१) पुन्हा दरवळला. निमित्त होते, कसदार अभिनयाने अजरामर झालेल्या आणि शायरीमुळे रसिकांच्या मनात स्थान मिळविलेल्या मीनाकुमारी यांच्या ४४ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित ‘एक थी पाकिजा...’ कार्यक्रमाचे!
केशवराव भोसले नाट्यगृहात ‘लोकमत सखी मंच’ व ‘हृदयस्पर्श’ या हौशी सांस्कृतिक व्यासपीठातर्फे आयोजित कार्यक्रमाचे उपमहापौैर शमा मुल्ला यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. यावेळी ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर, ‘हृदयस्पर्श’चे पद्माकर कापसे, पद्मिनी कापसे, दिलीप लडगे, वैशाली क्षीरसागर, डॉ. चंद्रकांत मिठारी, पंडित कंदले, किसन कल्याणकर, आदी उपस्थित होते.
ट्रॅजेडी क्वीन, अभिनयसम्राज्ञी मीनाकुमारी यांची शोकात्मक चरित्रगाथा आणि रूपेरी प्रवास दृक्-श्राव्य, निवेदन व थेट गाण्यांच्या कार्यक्रमातून चाहत्यांनी अनुभवला. यामध्ये सात गाणी थेट सादरीकरणाद्वारे, तर बारा गाणी मूळ स्वरूपात पडद्यावर दाखविण्यात आली.
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिभासंपन्न अभिनेत्री मीनाकुमारी यांच्या चित्रपट प्रवासावर आधारित, बचपन की मुहब्बत को दिलसे है जुदा करना, रुक जा बीते ना मिलन की बेला, दिल जो न कह सका, इन्ही लोगों ने... इन्ही लोगों ने ले लिना दुपट्टा मेरा... या गीतांनी उपस्थितांना भूतकाळाची सफर घडविली. कृष्णधवलातील मूळ स्वरूपात दाखविण्यात आलेल्या ज्योती कलश झलके, मौसम है आशिकाना, हम इंतजार करेंगे तेरा कयामत तक, न जाओ सैय्या छुडाके बैय्या... या गाण्यांनी चाहत्यांची वाहवा मिळविली.
मीनाकुमारी यांच्या आयुष्यातील माईलस्टोन ठरलेल्या ‘बैजू बावरा’ या चित्रपटातील ‘मोहे भूल गये सावरियॉँ...’, ‘छू लेने दो नाजूक होंटो को... ’, ‘आज हम दुवाओं का असर देखेंगे...’ यासारख्या गीतांनी उपस्थितांना भावनिक साद घातली.
मीनाकुमारी यांच्या काही गीतांचे कीर्ती सुतार यांनी आपल्या सुरेल आवाजात सादरीकरण केले. त्यांना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. प्रथितयश गायक प्रल्हाद पाटील यांनी भावोत्कट निवेदनातून मीनाकुमारीचे जीवनचित्र उभे केले. विक्रांत पाटील यांनी त्यांना पार्श्वसंगीत साथ दिली. मंदार पाटील यांनी संकलन केले. स्क्रीन सादरीकरण सज्जन लोहार यांनी केले. चित्रफीत संकलन ‘मल्टिमिक्स सिस्टीम’चे मंदार पेटकर यांनी पाहिले. कार्यक्रमाची संकल्पना-संहिता पद्माकर कापसे यांनी, तर निर्मिती पद्मिनी कापसे यांची होती.
मनोजकुमार यांचे अभिनंदन
‘भारतकुमार’ अशी उपाधी असणारे कलाकार मनोजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करून ‘हृदयस्पर्श’तर्फे लवकरच त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मीनाकुमारी युगाचा सुगंध दरवळला

‘भारतकुमार’ अशी उपाधी असणारे कलाकार मनोजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करून ‘हृदयस्पर्श’तर्फे लवकरच त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम करणार असल्याचे जाहीर करण्यात आले.