पतौडी खाणीजवळ शिवीगाळ करून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:26 IST2021-08-28T04:26:50+5:302021-08-28T04:26:50+5:30

कोल्हापूर : रंकाळा पतौडी खणीजवळ मित्रासोबत पैसे आणण्यास गेलेल्या तरुणास विनाकारण शिवीगाळ करून चामडी पट्ट्याने मारहाण केली. याबाबतची फिर्याद ...

Swearing and beating near Pataudi mine | पतौडी खाणीजवळ शिवीगाळ करून मारहाण

पतौडी खाणीजवळ शिवीगाळ करून मारहाण

कोल्हापूर : रंकाळा पतौडी खणीजवळ मित्रासोबत पैसे आणण्यास गेलेल्या तरुणास विनाकारण शिवीगाळ करून चामडी पट्ट्याने मारहाण केली. याबाबतची फिर्याद नितीन बाळासाहेब वाळवे (वय ३०, सूर्यवंशी काॅलनी, सानेगुरुजी वसाहत) यांनी जुना राजवाडा पोलिसांत दिली. मयूर कांबळे (रा. म्हाडा काॅलनी, आपटेनगर), असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी व संशयित हे दोघेही ओळखीचे आहेत. फिर्यादी हा त्याच्या मित्रासोबत भोसले नावाच्या व्यक्तीकडे पतौडी खणीजवळ गुरुवारी (दि.२६) गेले होते. यावेळी तू का आलास असे म्हणून विनाकारण शिवीगाळ करून त्याने व त्याच्या सोबत असलेल्या मित्रांनी कमरेचा चामडी पट्टा काढून मारहाण केली. जखमी फिर्यादीची दुचाकीचीही तोडफोड केली. याबाबतचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला असून, तपास सहायक फौजदार दांगट करीत आहेत.

Web Title: Swearing and beating near Pataudi mine