शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

आंतरराष्ट्रीय पॅरा जलतरणपटू स्वप्निल पाटीलचे जल्लोषी स्वागत; पंतप्रधानांकडून विशेष कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 6:04 PM

जकार्ता (इंडोनेशिया) येथे झालेल्या पॅरा एशियन गेम्समध्ये कोल्हापूरचा गोल्डनबॉय पॅरा जलतरणपटू स्वप्निल संजय पाटील याने एक रौप्य व दोन कांस्य पदकांची कमाई केली. या कामगिरीनंतर तो प्रथमच करवीरनगरीत बुधवारी दाखल झाला. त्याचे दसरा चौक येथे आमदार सुजीत मिणचेकर यांच्या हस्ते मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय पॅरा जलतरणपटू स्वप्निल पाटीलचे जल्लोषी स्वागत; पंतप्रधानांकडून विशेष कौतुकजकार्ता येथे झालेल्या पॅरा एशियन गेम्समध्ये एक रौप्य, दोन कांस्यची कमाई

कोल्हापूर : जकार्ता (इंडोनेशिया) येथे झालेल्या पॅरा एशियन गेम्समध्ये कोल्हापूरचा गोल्डनबॉय पॅरा जलतरणपटू स्वप्निल संजय पाटील याने एक रौप्य व दोन कांस्य पदकांची कमाई केली. या कामगिरीनंतर तो प्रथमच करवीरनगरीत बुधवारी दाखल झाला. त्याचे दसरा चौक येथे आमदार सुजीत मिणचेकर यांच्या हस्ते मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.स्वप्निलने पॅरा आशियाई स्पर्धेत प्रथमच सहभाग नोंदवत ५० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य, तर ४०० मीटर फ्रीस्टाईल व १०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये कांस्य पदकांची कमाई करीत देशासाठी एकूण तीन पदके मिळवली. यासह त्याने ४ बाय १०० रिलेमध्ये चौथा क्रमांक पटकाविला. आशिया खंडातून या स्पर्धेसाठी ४८ देश सहभागी झाले होते.पॅरालिम्पिक कमिटी आॅफ इंडियातर्फे भारतातून १९४ जणांचे सर्व खेळ प्रकारासाठी पथक गेले होते. यात १९ पॅरा जलतरणपटू होते त्यांपैकी एक कोल्हापूरचा स्वप्निल होता. त्याने एक रौप्य व दोन कांस्य पदकांची कमाई केली. या कामगिरीची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे खास दिल्ली येथील निवासस्थानी त्याचे विशेष कौतुक केले.

या कामगिरीनंतर तो प्रथमच बुधवारी सायंकाळी पाच वाजता करवीर नगरीत दाखल झाला. त्याचे स्वागत करवीरवासियांतर्फे आमदार डॉ. सुजीत मिणचेकर यांनी केले. यावेळी पी. जी. टी.चे विश्वस्त विरेंद्र घाटगे, कोल्हापूर जिल्हा पॅरालिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आकाश कोरगावकर, अमोल कोरगावकर, अनिल पोवार, आर. डी. आरळेकर, निसार मोमीन, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, वस्ताद मुकुंद करजगार, संजय पाटील, चेतन पाटील, अजय पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. त्याची दसरा चौक, गोखले कॉलेज- शास्त्रीनगर येथील त्याच्या राहत्या घरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.

जकार्ता येथील पॅरा एशियन गेम्समध्ये काही अंशांनी माझे सुवर्ण हुकले आहे. त्याची कसर येणाऱ्या २०२० च्या आॅलिम्पिकमध्ये पात्र ठरून भरून काढण्याचा इरादा आहे.- स्वप्निल पाटील, आंतरराष्ट्रीय पॅरा जलतरणपटू

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीkolhapurकोल्हापूर