स्वामी समर्थांची पालखी भक्तांच्या भेटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 11:59 IST2019-12-05T11:57:50+5:302019-12-05T11:59:13+5:30

अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे कोल्हापुरातील भाविकांच्या घरी भेटी देण्यात आल्या. पुढील दोन दिवस ही पालखी शहरात फिरणार असून, पुढे वाशीसाठी प्रस्थान होणार आहे.

Swami Samarth's palanquin visits devotees | स्वामी समर्थांची पालखी भक्तांच्या भेटीला

कोल्हापुरातील साने गुरुजी वसाहत येथील सुदेश देशपांडे यांच्या घरी श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. (छाया : आदित्य वेल्हाळ)

ठळक मुद्देस्वामी समर्थांची पालखी भक्तांच्या भेटीलादोन दिवस ही पालखी शहरात फिरणार

कोल्हापूर : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे कोल्हापुरातील भाविकांच्या घरी भेटी देण्यात आल्या. पुढील दोन दिवस ही पालखी शहरात फिरणार असून, पुढे वाशीसाठी प्रस्थान होणार आहे.

दरवर्षी श्रींच्या पादुका असलेली पालखी तीन दिवस कोल्हापुरात येते. या कालावधीत शहरातील भाविकांच्या घरी भेटी दिल्या जातात. बुधवारी सानेगुरुजी वसाहत परिसरातील सुदेश देशपांडे, राजू बेले, क्रशर चौकातील एकजुटी तरुण मंडळ, कणेरकर नगरातील समीर वर्णे, रिंगरोड येथील किरण पाटील, सुनील शिंदे, लक्षतीर्थ वसाहत येथील मनोज तपकिरे, अमृता हुल्ले या भाविकांच्या घरी पालखीचे स्वागत करण्यात आले.

रात्री कर्तव्य तरुण मंडळ, उत्तरेश्वर पेठ येथे मुक्कामास थांबली. आज, गुरुवारी व शुक्रवारच्या मुक्कामानंतर शनिवारी (दि. ७) पालखी वाशीसाठी प्रस्थान करील.

 

 

Web Title: Swami Samarth's palanquin visits devotees