शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

'स्वाभिमानी' आज कारखान्यांच्या अध्यक्षांना खर्डा-भाकरी देणार, १५ नोव्हेंबरला आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 12:14 IST

जयसिंगपूर : अद्याप शासनाने काही लक्ष घातलेले नाही. कारखानदारांनी स्वारस्य दाखविलेले नाही. काही कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न केल्यानंतर शेतकऱ्यांनी ...

जयसिंगपूर : अद्याप शासनाने काही लक्ष घातलेले नाही. कारखानदारांनी स्वारस्य दाखविलेले नाही. काही कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न केल्यानंतर शेतकऱ्यांनी तो प्रयत्न हाणून पाडला. ऊस परिषदेत ठरल्याप्रमाणे आज, शुक्रवार (दि.१०) पासून चार दिवस कांदा, खर्डा-भाकर घेऊन कारखान्यांच्या अध्यक्षांना दिली जाणार आहे.गेल्या हंगामात तुटलेल्या उसाला एफआरपीशिवाय चारशे रुपये जास्त मिळावेत, चालू हंगामातील उसाला एकरकमी ३५०० रुपये उचल मिळाल्याशिवाय उसाला कोयता लावू देणार नाही, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे. २२ व्या ऊस परिषदेनंतर मंगळवार (दि. ७) पासून माजी खासदार शेट्टी यांनी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांसह जयसिंगपूर विक्रमसिंह क्रीडांगणावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, निमशिरगाव येथून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी पायी दिंडी काढून आंदोलनस्थळी माजी खासदार शेट्टी यांना भेट दिली. यावेळी सागर मादनाईक, बंडू पाटील, राम शिंदे, सुभाष शेट्टी, शैलेश आडके, स्वस्तिक पाटील, योगेश जिवाजे, राजू कुपवाडे, राजू बुराण यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते उपस्थित होते. १५ नोव्हेंबरला आंदोलनाची पुढील दिशा स्वाभिमानी जाहीर करणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाSugar factoryसाखर कारखाने