शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

उसाचा दुसरा हप्ता ४०० रुपये घेतल्याशिवाय माघार नाही; 'स्वाभिमानी'च्या आक्रोश पदयात्रेला शिरोळमधून सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 11:15 IST

३७ साखर कारखान्यांवर २२ दिवस ५२२ कि.मी पदयात्रा

संदीप बावचेशिरोळ : उसाचा दुसरा हप्ता ४०० रूपये प्रतिटन या व राज्यातील साखर कारखान्यांचे वजन काटे डिझीटल केल्याशिवाय यंदा गाळपास परवानगी देऊ नये, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आक्रोश पद यात्रेस मंगळवारी शिरोळ येथून प्रारंभ झाला. स्वाभिमानीचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दत्त साखर कारखान्यास मागण्यांचे निवेदन देऊन पद यात्रेस सुरुवात करण्यात आली. शिरोळ ते दत्त कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर सकाळी साडेआठ वाजता माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी यांच्या उपस्थितीत पदयात्रेला सुरुवात झाली. ढोल -हलगीच्या निनादात व घोषणाबाजी देत ही यात्रा पुढे सुरू झाली. ठिकठिकाणी या यात्रेचे स्वागत करण्यात आले, महिलांनी औक्षणही केले. शिरोळ नगरपालिकेसमोर नराराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी राजू शेट्टी यांना पुष्पहार घालून स्वागत केले. त्यानंतर शिवाजी तक्तापासून ही यात्रा शिरटी फाटा येथे आल्यानंतर जेसीबीतून फुलांची उधळण व फटाक्याची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला. कारखानदारांकडून घामाचे दाम वसूल करूया आता माघार नाही असे फलक लक्षवेधी ठरले.सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी केवळ एफआरपी दिलेली आहे. साखरेचे बाजारभाव ३८०० रूपयांच्या घरात आहेत. पुणे जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी ४०० ते ५०० रूपये एफआरपी पेक्षा अधिक रक्कम दिली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची रिकव्हरी पुणे जिल्ह्यापेक्षा जास्त असताना देखील दुसरा हप्ता देण्यास नकार देत आहेत. त्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानीने आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे.३७ साखर कारखान्यांवर २२ दिवस ५२२ किमी पदयात्रा चालत जाऊन ७ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत ही पदयात्रा सामील होणार आहे.  जोपर्यंत ४०० रूपयांचा हप्ता दिला जात नाही. तोपर्यंत एकाही साखर कारखान्याची ऊस तोड सुरू होणार नसल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीSugar factoryसाखर कारखाने