शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

'स्वाभिमानी'चे चक्काजाम आंदोलन: पुणे-बेंगळुरू महामार्गावरच बसल्या पंगती; तोडगा काढण्यासाठी शाहू महाराजांचा पुढाकार

By उद्धव गोडसे | Updated: November 23, 2023 17:21 IST

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दराचे आंदोलन तीव्र केले असून, गुरुवारी दुपारपासून पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखून धरला. शिरोली पुलाची ...

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दराचे आंदोलन तीव्र केले असून, गुरुवारी दुपारपासून पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखून धरला. शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथे हजारो शेतक-यांची महामार्गावरच पंगत बसली. घरातून बांधून आणलेली शिदोरी आणि आंदोलकांनी रस्त्यावर शिजवलेली भात-आमटी खावून आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार शेतक-यांनी व्यक्त केला. दरम्यान, शेतक-यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी श्रीमंत शाहू महाराज यांनी पुढाकार घेतला असून, त्यांनी आंदोलनस्थळी जाऊन राजू शेट्टी यांची भेट घेतली.मागील हंगामातील प्रतिटन ४०० रुपये आणि नवीन हंगामात उसाला एकरकमी ३५०० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन तीव्र केले आहे. गुरुवारी दुपारी पुणे-बेंगळुरू महामार्गावर आंदोलकांना रास्ता रोको केला. हजारो आंदोलकांनी महामार्गावरच ठाण मांडल्यामुळे पोलिसांनी वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळवावी लागली. तरीही महामार्गावर दुतर्फा लांबच लांब वाहनांच्या रांगा आहेत. पोलिसांचा विरोध झुगारून आंदोलकांनी महामार्गावर भात आणि आमटी तयार केली. तसेच सोबत आणलेली शिदोरी सोडून महामार्गावर पंगती बसवल्या. अनेक आंदोलक येताना तांदूळ आणि भाज्या घेऊन आले आहेत, त्यामुळे ऊस दरावर तोडगा निघेपर्यंत महामार्गावरच ठाण मांडण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे. श्रीमंत शाहू महाराज यांनी आंदोलनस्थळी जाऊन राजू शेट्टी यांची भेट घेतली. ऊस दराच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेण्याची ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान, काही साखर कारखानदारांची शासकीय विश्रामगृह येथे बैठक सुरू असून, शेट्टी यांच्या मागणीवर चर्चा सुरू आहे. लवकरच तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाhighwayमहामार्ग