शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच घालविली रात्र, लिंगनुर-कापशीत ऊस वाहतूक धरली रोखून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 11:36 IST

दत्ता पाटील म्हाकवे : महाविकास आघाडी सरकारने एफआरपीचे दोन तुकडे करण्याचा केलेला बेकायदेशीर कायदा रद्द करावा, यासह विविध मागण्यांकडे ...

दत्ता पाटीलम्हाकवे : महाविकास आघाडी सरकारने एफआरपीचे दोन तुकडे करण्याचा केलेला बेकायदेशीर कायदा रद्द करावा, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या ऊसतोड व वाहतूक बंद आंदोलनास काल, गुरुवारी जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र काही ठिकाणी ऊस वाहतूक सुरूच होती. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल, गुरुवारची रात्र रस्त्यावरच जागवत वाहने रोखली. त्यामुळे महाराष्ट्रातील लिंगनुर-कापशी पासून कर्नाटकातील गायकवाडी पर्यंत शंभरहून अधिक वाहनांची रांग लागली आहे.वाहनातील ऊसासह वाहनांचे नुकसान होवू नये. यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात आले. केवळ मुठभर कार्यकर्ते असतानही ऊस वाहतूक गेल्या १४ तासांपासून रोखून ठेवली आहे. यामागे संघटनेचे वलय असल्यानेच हे शक्य असल्याचे संघटनेचे कार्यकर्ते संभाजी यादव यांनी सांगितले. यावेळी महादेव कामते (मेतके) उत्तम भांबरे (गलगले), उत्तम आवळेकर, निपाणी तालुकाध्यक्ष भाऊसो जिनगे (आकोळ),रमेश मगदुम (सिध्दनाथ), तात्यासो पाटील, राकेश पाटील(आकोळ), शिवाजी कमळकर (यमगे), पंडीत पाटील (नंद्याळ), पांडुरंग चौगले (भडगाव), संभाजीराव यादव (लिंगनुर) यासह सीमाभागातील संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.इथेनॉलच्या दरात प्रतिलिटर पाच रुपयांची वाढ करावी, साखरेचा किमान हमीभाव प्रतिक्विंटल ३५०० रुपये करावा, ऊसतोड मजुरांची नोंदणी व पुरवठा महामंडळाकडून करावी, या मागण्यांसाठी दोन दिवसांचे राज्यव्यापी ऊसतोड, वाहतूक बंद आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी स्वाभिमानीच्या आवाहनानुसार बहुतांशी ऊस उत्पादकांनी ऊसतोड घेतली नाही. अनेक ऊस वाहतूकदारांनीही वाहतूक केली नाही. काही ठिकाणी ऊस वाहतूक करण्याचा प्रयत्न झाला. मात्र कार्यकर्त्यांनी तो हाणून पाडला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना