शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: गडहिंग्लज येथील हमालाचा संशयास्पद मृत्यू!, पोलिसांकडून तपास सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 12:29 IST

कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचारादरम्यान झाला मृत्यू

राम मगदूम

गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरातील हमालाचा  काल, बुधवारी (८) रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. संतोष शंकर पोवार (वय ५०, मूळगाव गिजवणे, सध्या रा. लक्ष्मी मंदिराजवळ, गडहिंग्लज) असे त्याचे नाव आहे. त्याच्या संशयास्पद मृत्यूने लक्ष्मीरोडवरील भाजी विक्रेते आणि व्यापाऱ्यांतून हळहळ व्यक्त होत आहे.पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मूळचा गिजवणे येथील रहिवासी असणारा संतोष हा शहरातील लक्ष्मीरोडवर हमाली करत होता. पडेल ते काम करत, मिळेल ते खाऊन त्याच परिसरात राहत होता. त्याला दारूचे व्यसनही होते.मंगळवारी (७) रात्री येथील लक्ष्मी रोडवरील हिडदुगी यांच्या दुकानानजीक वीजेच्या डी.पी.जवळ संतोष आणि दोघांची वादावादी झाली. धक्काबुक्की व मारहाणीत तो खाली कोसळला. त्यानंतर उठून तो नेहमीच्या जागी झोपी गेला.दरम्यान, बुधवारी (८) सकाळी उशिरापर्यंत न उठल्यामुळे आजूबाजूच्या भाजी विक्रेत्यांनी त्याला  येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो बेशुद्धावस्थेत होता. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रात्री त्याचा मृत्यू झाला.व्यसनाधीनतेमुळे 'संतोष'शी पटत नसल्यामुळे त्याची पत्नी माहेरीच राहते असे समजते. त्याच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे.त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.'सीसीटीव्ही फुटेज'वरून तपास !गुरुवारी (९) सकाळी पोलीस उपनिरीक्षक शितल सिसाळ व समाधान घुगे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून आणि भाजी विक्रेते यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून 'संतोष'ची  कुणासोबत वादावादी झाली?त्याला मारहाण करणारे कोण? याचा कसून शोध पोलीस घेत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यूPoliceपोलिस