शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: गंगावेश येथील महिलेचा बेडरुममध्ये संशयास्पद मृत्यू; मूलबाळ नसल्याने राहत होत्या एकट्याच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 18:25 IST

उत्तरीय तपासणीनंतर त्यांचा व्हिसेरा आणि रक्ताचे नमुने राखीव ठेवले 

कोल्हापूर : गंगावेशीतील ऋणमुक्तेश्वर मंदिराजवळ शुक्रतारा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या उषा मारुती भिऊंगडे (वय ६९) यांचा राहत्या घरी बेडरूमध्ये संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला. हा प्रकार सोमवारी (दि. १६) सकाळी दहाच्या सुमारास निदर्शनास आला. उत्तरीय तपासणीनंतर त्यांचा व्हिसेरा आणि रक्ताचे नमुने राखीव ठेवले आहेत. याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.लक्ष्मीपुरी पोलिस आणि घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, उषा भिऊंगडे यांच्या पतीचे डिसेंबर २०२५ मध्ये निधन झाले. मूलबाळ नसल्याने त्या एकट्याच गंगावेशीतील त्यांच्या मालकीच्या फ्लॅटमध्ये राहत होत्या. फुलेवाडी रिंगरोड येथे राहणारा त्यांचा पुतण्या परशुराम भिऊंगडे हा रोज त्यांना भेटून जात होता.तब्येत बरी नसल्याने तो रविवारी रात्री त्यांना औषधे देऊन गेला होता. सोमवारी सकाळी तो कामानिमित्त शाहूवाडी तालुक्यात गेला होता. सकाळी दहाच्या सुमारास त्याने चुलतीच्या मोबाइलवर कॉल केला. मात्र, त्या फोन उचलत नसल्याने शेजाऱ्यांना फोन करून त्यांची चौकशी करण्याची विनंती केली. त्यावेळी शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहिले असता, त्या बेडरूममध्ये मृतावस्थेत आढळल्या.लक्ष्मीपुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. घरातील सर्व दागिने आणि रोकड सुरक्षित होती. तसेच, वृद्धेच्या अंगावर कुठेही जखमा नव्हत्या. तरीही पोलिसांनी ठसेतज्ज्ञांना पाचारण करून काही वस्तूंवरील ठसे घेतले. लक्ष्मीपुरी पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानेही घटनास्थळाची पाहणी केली.अहवालानंतर कारण स्पष्टझोपेत हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तरीही व्हिसेरा आणि रक्ताचे नमुने राखीव ठेवले आहेत. त्याच्या अहवालातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम कणेरकर यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Elderly Woman Found Dead in Apartment; Investigation Underway

Web Summary : Usha Bhiungade, 69, was found dead in her Kolhapur apartment. With no children, she lived alone after her husband's death. Her nephew, who visited daily, found her unresponsive. Police are investigating; the cause of death remains undetermined pending test results.