शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अनुसूचित जातीचे बोगस दाखले देणाऱ्यांना निलंबित करा, कोल्हापुरात आरक्षण बचाव समितीचा मोर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 11:37 IST

दाखले रद्द करण्याची मागणी

कोल्हापूर : आरक्षण आमचं मत बी आमचचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, जातीचे खोटे दाखले देणाऱ्या अधिकाऱ्यांचे करायचे काय खाली डोकं वर पाय.. अशा जोरदार घोषणांनी शहर दणाणून सोडत सोमवारी अनुसूचित जाती आरक्षण बचाव जनआंदोलन समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या आणि अर्थपूर्ण व्यवहार करून अनुसूचित जातीचे खोटे दाखले देणाऱ्या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी होऊन त्यांना तत्काळ सेवेतून निलंबित करा, त्यांच्या संपत्तीची चौकशी करा, बनावट दाखले काढून निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तींचे दाखले व सदस्यत्व रद्द करा तसेच त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी मागणी नेत्यांनी केली.नुकत्याच झालेल्या नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत तीन उमेदवारांना अनुसूचित जातीचे बोगस दाखले दिल्याची तक्रार आहे. ते रद्द करण्यासाठी मुख्यत: हा मोर्चा काढण्यात आला. बिंदू चौकातून सुरू झालेला मोर्चा लक्ष्मीपुरी, दसरा चौक, व्हिनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. कार्यकर्त्यांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.यावेळी माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, राजीव आवळे, उत्तम कांबळे, नगरसेवक दुर्वास कदम, शिवाजी कवाळे, बबन रानगे, रघुनाथ कांबळे, डी. जी. भास्कर, सुभाष रामुगडे, रघुनाथ मांडरे, प्रमोद कदम, सुभाष देसाई, विशाल देवकुळे, पांडुरंग कांबळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदस्य, अधिकारी आहेत तरी कोण..?पट्टणकोडोली येथील दरगोंडा पाटील, गडहिंग्लज नगराध्यक्ष महेश तुरबतमठ, इचलकरंजी नगरसेविका अलका स्वामी यांची अनुसूचित जाती प्रमाणपत्रे तत्काळ रद्द करावीत. अपूर्ण कागदपत्रांवर कायद्याची खातरजमा न करता खोटे दाखले दिल्याबद्दल इचलकरंजी उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे, तहसीलदार महेश खिलारे, हातकणंगले येथील कार्यकारी दंडाधिकारी सुशील बेलेकर, गडहिंग्लज कार्यकारी दंडाधिकारी ऋषिकेष शेळके, उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे यांची खातेनिहाय व संपत्तीची चौकशी करावी, अशी मागणी मोर्चात करण्यात आली.

English
हिंदी सारांश
Web Title : Action urged against fake caste certificate providers in Kolhapur.

Web Summary : Kolhapur witnessed a protest demanding action against officials issuing fake caste certificates. Protesters seek suspension and investigation of involved officers, cancellation of fraudulent certificates, and filing of criminal charges. The march stemmed from concerns about bogus certificates used in recent elections.