शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

‘क्रिप्टो करन्सी’तील फसवणूक दीड कोटीवर, संशयित संघमित्राची कारागृहात रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 11:30 IST

संशयित सचिन अर्जुन संघमित्रा याच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे आणखी १७ गुंतवणूकदारांनी तक्रारी नोंदवल्या

कोल्हापूर : क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतवून त्याच्या दामदुपटीचे आश्वासन देऊन गंडा घातल्याप्रकरणी अटक केलेला संशयित सचिन अर्जुन संघमित्रा (वय ४२, रा. विचारेमाळ, कोल्हापूर) याच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे आणखी १७ गुंतवणूकदारांनी तक्रारी नोंदवल्या. त्यामुळे फसवणुकीची व्याप्ती वाढली असून ती १ कोटी ६८ लाखापर्यंत पोहोचली आहे. तक्रारीचा ओघ अद्याप वाढतच आहे. न्यायालयाने त्याचा जामीन नाकारल्याने त्याची कारागृहात रवानगी केली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फॉरेक्स क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करून पैसे दामदुप्पट करून देतो म्हणून संशयित सचिन संघमित्रा याने विचारेमाळ येथील सिध्दांत देवानंद फाळके याचा विश्वास संपादन करून त्याच्याकडून १६ लाख ५० हजार रुपये घेतले. पण गुंतवणुकीच्या नावाखाली घेतलेल्या पैशाचा परतावा अगर मुद्दल परत न देता फसवणूक केली.याबाबत फाळके याने दिलेल्या तक्रारीनुसार शाहूपुरी पोलिसात गुन्हा नोंदवला. पण गुन्ह्याची व्याप्ती पाहता हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. पो. नि. श्रीकृष्ण कटकधोंड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास करून संशयित संघमित्राला दि. २४ फेब्रवुारीला अटक केली. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी दिली होती.पोलिसांच्या आवाहनानुसार आर्थिक गुन्हे शाखेकडे आणखी संघमित्राविरोधात १७ जणांनी फसवणूक झाल्याची तक्रार दिली. त्यानुसार फसवणुकीची व्याप्ती वाढून ती १ कोटी ६८ लाखापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे तक्रारींचा ओघ वाढतच आहे. संघमित्रा याचा जामीन न्यायालयाने बुधवारी नाकारला. त्यानुसार त्याची कारागृहात रवानगी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी