संशयिताने मृतदेह टाकलेल्या ठिकाणी दोन वेळा दिली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:24 IST2021-02-13T04:24:37+5:302021-02-13T04:24:37+5:30

कोल्हापूर : पाचगावमधील वृद्धेच्या खून प्रकरणातील संशयित संतोष परीट याने मृतदेह टाकलेल्या राजाराम तलाव परिसरातील जागेवर मृतदेह तेथेच ...

The suspect visited the place where the body was dumped twice | संशयिताने मृतदेह टाकलेल्या ठिकाणी दोन वेळा दिली भेट

संशयिताने मृतदेह टाकलेल्या ठिकाणी दोन वेळा दिली भेट

कोल्हापूर : पाचगावमधील वृद्धेच्या खून प्रकरणातील संशयित संतोष परीट याने मृतदेह टाकलेल्या राजाराम तलाव परिसरातील जागेवर मृतदेह तेथेच आहे का, याची खातरजमा घटनास्थळी जाऊन दोन वेळा केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.

सोन्याच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी शांतबाई आगळे-गुरव या वृद्धेचा संशयित परीट याने टाकाळा येथील अपार्टमेंटमधील राहत्या खोलीत भिंतीवर डोके आपटून खून केला. त्यांनतर वृद्धेच्या अंगावरील दागिने काढून घेतले. त्यानंतर मृतदेह वाकवून पोत्यात भरला. ते पोते आपल्या मोपेडवरून राजाराम तलाव परिसरात नेले. भरदिवसा मृतदेह टाकल्यानंतर त्याने दोन वेळा मृतदेह तेथेच आहे का, याची खातरजमा केली. ही बाब पोलीस तपासात निष्पन्न झाली. संशयिताने राजाराम तलाव परिसरात मोपेडवरून जाण्यासाठी ज्या मार्गाचा वापर केला. त्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज ताब्यात घेण्याचे काम पोलीस करीत आहेत.

चौकट

वृद्धेचे दागिने संशयिताने दोन वित्तीय संस्थांकडे गहाण ठेवून त्यातून दोन लाख रुपये कर्जाऊ उचलल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबत त्या कंपन्यांच्या प्रतिनिधींकडे पोलिसांनी चौकशी केली आहे. ती कागदपत्रे लवकरच ताब्यात घेतली जाणार आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक सीताराम डुबल यांनी दिली.

Web Title: The suspect visited the place where the body was dumped twice