शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

नाही भीती, महापुरातही सुसह्य होणार प्रसूती; कोल्हापूर जिल्हा परिषदेचे नियोजन पुर्ण

By समीर देशपांडे | Updated: May 23, 2025 13:50 IST

समीर देशपांडे कोल्हा पूर : जिल्ह्यातील ३९१ पूरबाधित गावातील गरोदर महिलांचे सर्वेक्षण करून अशा सर्वांना आठ दिवस आधीच जवळच्या ...

समीर देशपांडेकोल्हापूर : जिल्ह्यातील ३९१ पूरबाधित गावातील गरोदर महिलांचे सर्वेक्षण करून अशा सर्वांना आठ दिवस आधीच जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात येणार आहे. यासाठी जून ते सप्टेंबर २०२५ या चार महिन्यांतील संभाव्य प्रसूती होणाऱ्या महिलांची यादीही आरोग्य विभागाने तयार केली आहे.२००५ पासून आतापर्यंत मोठे चार पूर येऊन गेले आहेत. याचा जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील ३९१ गावांना फटका बसला आहे. त्यामुळे महापूर आला तर किती गावांना, किती प्रमाणात झळ बसते हे निश्चित झाले आहे. म्हणूनच ज्या गावांचा संपर्क तुटतो अशा गावातील गरोदर महिलांची काळजी घेण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. कारण अनेकदा रात्रीतून नदी, ओढ्याचे पाणी वाढल्याने गावांचा संपर्क तुटतो आणि अशा परिस्थितीत गरोदर मातांची कुचंबणा आणि आरोग्यविषयक प्रश्नही निर्माण हाेऊ शकतो. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत ज्या महिलांची प्रसूती होऊ शकते त्यांची गावनिहाय यादी तयार केली आहे.त्यांना जवळच्या कोणत्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करायचे आहे त्यासाठी कोणती रुग्णवाहिका वापरायची आहे याचेही नियोजन तयार करण्यात आले आहे. याच पद्धतीने याआधीही गतवर्षी तीन महिन्यांतील २ हजार ९८४ गरोदर महिलांना प्रसूतीसाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.

  • ग्रामीण भागातील नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांची संख्या - ४८७
  • या दवाखान्यातून उपलब्ध खाटा - ७,०५६
  • १२४ आरोग्य पथके
  • प्रत्येक तालुक्यासह हातकणंगले, करवीर आणि शिरोळ येथे अतिरिक्त औषधसाठा

जिल्ह्यातील आरोग्य संस्थासामान्य, उपजिल्हा रुग्णालय - ०६ग्रामीण रुग्णालये - १५प्राथमिक आरोग्य केंद्रे - ८१प्राथमिक आरोग्य पथके - ०५तालुका दवाखाना - ०४आयुर्वेदिक दवाखाना - १६जिल्हा परिषद दवाखाने - ०२आरोग्य उपकेंद्रे - ४१४रुग्णवाहिका १०८ क्रमांक - ३६रुग्णवाहिका १०२ क्रमांक - ७५

जिल्ह्यातील याआधीच्या महापुरांचा अभ्यास करून जिल्हा परिषदेने आपत्कालीन आराखडा तयार केला आहे. यामध्ये पावसाळ्यात ज्या गावांचा संपर्क तुटतो अशा गावातील चार महिन्यांतील गरोदर मातांना आधीच आठ दिवस प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्याचे नियोजन पूर्ण केले आहे. यासाठी आवश्यक औषधी आणि यंत्रणा पुरवण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. - कार्तिकेयन एस. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरhospitalहॉस्पिटलpregnant womanगर्भवती महिलाzpजिल्हा परिषद