शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील महापूर नियंत्रणासाठी सर्वेक्षण सुरू, चारजणांचे पथक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 18:39 IST

पुण्यातील संस्था करणार महापुराचा अभ्यास

कोल्हापूर : प्रत्येक वर्षी पंचगंगा नदीला येणाऱ्या महापुराचा नागरी जीवनावर फारसा परिणाम होऊ नये तसेच वित्तीय नुकसानसुद्धा टाळले जावे यासाठी कराव्या लागणाऱ्या तात्पुरत्या त्याचबरोबर कायमस्वरूपी उपाययोजनांसंदर्भात पुण्यातील एका खासगी संस्थेने सर्वेक्षण सुरू केले आहे. गेल्या आठ दिवसांपासून या संस्थेचे चार जणांचे एक पथक सर्व संबंधितांकडून त्याचबरोबर प्रत्यक्ष जागेवर जाऊन माहिती घेत आहे.पंचगंगा तसेच कृष्णा नदीच्या महापुरामुळे प्रत्येक वर्षी नागरी जनजीवन विस्कळीत होत असते. शेतात, घरात महापुराचे पाणी शिरल्यामुळे शेतीसह प्रापंचिक तसेच घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. आठ दहा दिवस नागरिकांना विस्थापित ठिकाणी वास्तव्य करावे लागते. जनावरांची सोय करावी लागते. यामुळे प्रशासनावरसुद्धा मोठा ताण पडतो.प्रत्येक वर्षीच्या या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारला तात्पुरत्या तसेच कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या लागणार आहेत. त्याकरिता राज्य सरकारने जागतिक बँकेकडून ३,२०० कोटी रुपयांचे कर्जाच्या माध्यमातून निधी उपलब्ध केला आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी त्यात पुढाकार घेतला आहे.पंचगंगा तसेच कृष्णा नदीच्या महापुरावर नियंत्रण मिळविण्यासाठी काय काय उपाययोजना कराव्या लागतील याचा अभ्यास करून अहवाल देण्यासाठी पुण्यातील प्रायमो या संस्थेची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. या संस्थेचे चार जणांचे एक पथक गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापूर शहर परिसरात पूरक्षेत्रात पाहणी करून माहिती गोळा करत आहे. महापुरामुळे पर्यावरणीय तसेच सामाजिक परिणाम काय होतात, महापुराचे पाणी कोठेपर्यंत येते, महापूर आल्यानंतर नागरिकांचे स्थलांतर कोठे केले जाते, त्या ठिकाणी त्यांना कशा प्रकारे सुविधा दिल्या जातात, याची माहिती या पथकाकडून घेतली जात आहे.पूर नियंत्रणाच्या अनुषंगाने सुरू असलेले हे सर्वेक्षण आणखी काही महिने सुरू राहणार आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर त्याचा अहवाल राज्य सरकारला दिला जाईल. त्यानंतर पूरनियंत्रणासंदर्भातील प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरPuneपुणे