सुरेश पाटील स्मृतिदिनी महाआरोग्य शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:21 IST2021-01-18T04:21:51+5:302021-01-18T04:21:51+5:30
नवे पारगाव : वारणा बँकेचे माजी संचालक व अंबप (ता. हातकणंगले) येथील बापूसाहेब यशवंत पाटील सहकार समूहाचे अध्यक्ष स्व. ...

सुरेश पाटील स्मृतिदिनी महाआरोग्य शिबिर
नवे पारगाव : वारणा बँकेचे माजी संचालक व अंबप (ता. हातकणंगले) येथील बापूसाहेब यशवंत पाटील सहकार समूहाचे अध्यक्ष स्व. सुरेश बापूसाहेब पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मोफत वैद्यकीय महाआरोग्य शिबिरात ४५७ जणांची तपासणी करण्यात आली. यावेळी झालेल्या रक्तदान शिबिरात ११५ जणांनी रक्तदान केले.
महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री जयवंतराव आवळे, तर रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते झाले.
बेळगाव के. एल. ई.च्या डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलच्या ३० तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने तपासणी केली.
माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, दलितमित्र अशोकराव माने, प्रमोद कोरे, राजवर्धन मोहिते, सुभाष जाधव, महेंद्र शिंदे, संदीप दबडे, रामकृष्ण लोकरे, पंडितराव लोकरे, नागावचे सुभाष पाटील, नंदकुमार पाटील, सत्यजित कदम, प्रा. प्रदीप तोडकर, माजी सरपंच संपत कांबळे, पारगावचे इंद्रजित पाटील, राजेंद्र हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रदीपकुमार पाटील, सागर डोंगरे, अनिल पाटील, सुनील पाटील, श्रीमती सुरेखा पाटील, शिवराज पाटील, डॉ. ऐश्वर्या पाटील आदींनी स्व. सुरेश पाटील यांना आदरांजली वाहिली.
बापूसाहेब पाटील दूध संस्थेचे अध्यक्ष ॲड. राजवर्धन पाटील, उपाध्यक्ष महादेव सूर्यवंशी, सचिव प्रदीप पाटील, वाहनधारक पतसंस्थेचे अध्यक्ष सोमराज पाटील, उपाध्यक्ष पी. एस. लोकरे, सचिव जनार्दन कापसे, अंबप विकासचे अध्यक्ष डॉ. बी.के. पाटील, उपाध्यक्ष पोपट जाधव, सचिव हिंदुराव मुळीक, विनय कोरे पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष सुदाम पाटील, उपाध्यक्ष अमृता माळी, सचिव ज्ञानदेव डोंगरे व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो ओळी : अंबप (ता. हातकणंगले) येथे स्व. सुरेश पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी माजी मंत्री जयवंतराव आवळे. सोबत ॲड. राजवर्धन पाटील व संस्था समूहाचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.