शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सुरतचा अभियंता करणार कोल्हापूरचा पाणीपुरवठा सुरळीत, शिंगणापूर योजनेतून पाणी देण्याचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 18:27 IST

सॉफ्टवेअरची आज दुरुस्ती 

कोल्हापूर : काळम्मावाडीच्या थेट पाइपलाइन योजनेमधील एका पंपात बिघाड झाल्याने कोल्हापूर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. एका पंपाचे व्हीडीएफ कार्ड बदलूनही सॉफ्टवेअरमध्ये एरर दाखवत असल्याने आता याची दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेने संबंधित कंपनीच्या अभियंत्याला सुरतहून पाचारण केले आहे.

हा अभियंता आज, शनिवारी दुपारी कोल्हापुरात पोहोचणार असून त्यानंतर सॉफ्टवेअरच्या दुरुस्तीचे काम सुरू होणार असल्याची माहिती जलअभियंता हर्षजित घाटगे यांनी दिली. हे काम दोन दिवसांत पूर्ण झाले तर सोमवारपासून शहराचा पाणीपुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.घाटगे म्हणाले, काळम्मावाडीतील चार पंपांपैकी तीन पंप सुरू होते. एक पंप अतिरिक्त होता. यांतील दोन पंपांमध्ये बिघाड झाला आहे. यासाठी दोन वेळा व्हीडीएफ कार्ड बदलले, परंतु यश आले नाही. त्यामुळे संबंधित सॉफ्टवेअरच्या एबीपी कंपनीशी संपर्क साधून त्यांच्या अभियंत्यांना कोल्हापुरात बोलावले आहे. हा अभियंता आज शनिवारी दुपारपर्यंत काळम्मावाडीत पोहचेल. त्यानंतर याची दुरुस्ती करण्याची प्रक्रिया सुरू होईल.

शिंगणापूरही आज सुरू होणारशिंगणापूर पंपिग स्टेशनच्या ट्रान्स्फॉर्मरचे काम पूर्ण केले आहे. आज, शनिवारी दुपारी ट्रायल घेऊन संध्याकाळपर्यंत शिंगणापूरचा पंपही सुरू करण्यात येईल. काळम्मावाडीतून थेट बावड्याला, शिंगणापूर योजनेतून ई वॉर्ड, राजारामपुरी व बालिंगा पंपामधून सी व डी वॉर्डांना पाणी देण्याचे नियोजन केले असल्याचे घाटगे यांनी सांगितले.