सुप्रिया सुळे-धनंजय महाडिक भेटीवर सोशल मीडियावर धुरळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 18:08 IST2020-07-24T18:06:51+5:302020-07-24T18:08:22+5:30

राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे व माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या शुक्रवारी झालेल्या भेटीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. स्वत: सुळे यांनी या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर प्रतिक्रियांचा नुसता धुरळाच उडाला.

Supriya Sule-Dhananjay Mahadik's meeting on social media dust | सुप्रिया सुळे-धनंजय महाडिक भेटीवर सोशल मीडियावर धुरळा

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व माजी खासदार धनंजय महाडिक यांची शुक्रवारी मुंबईत भेट झाली. या भेटीचा फोटो स्वत: सुळे यांनी सोशल मीडियावर प्रसारित केल्यानंतर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. 

ठळक मुद्देसुप्रिया सुळे-धनंजय महाडिक भेटीवर सोशल मीडियावर धुरळाअराजकीय भेट असल्याचे महाडिक यांचे म्हणणे

कोल्हापूर : राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे व माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या शुक्रवारी झालेल्या भेटीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. स्वत: सुळे यांनी या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर प्रतिक्रियांचा नुसता धुरळाच उडाला.

या भेटीबद्दल स्वतः महाडिक म्हणतात, ही कोणत्याही प्रकारची राजकीय भेट नव्हती. साखर उद्योगासमोरील अडचणींबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी शिष्टमंडळ मुंबईत गेले होते. तिथे पवार नसल्याने सुप्रिया सुळे यांनी आमचे स्वागत केले. त्यापलीकडे कोणतीही चर्चा झाली नाही.

धनंजय महाडिक यांनी लोकसभेतील पराभवानंतर राष्ट्रवादीला रामराम करीत भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीतील त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात पक्षाने त्यांना खूप मानसन्मान दिला होता. मात्र त्यांनी पक्ष अडचणीत असताना साथ सोडल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत कमालीचा रोष असल्याचे दिसून येते. त्यात शुक्रवारी महाडिक यांच्या भेटीचा फोटो सुळे यांनी प्रसारित केल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांतून उलटसुलट प्रतिक्रिया उमटली.

 

Web Title: Supriya Sule-Dhananjay Mahadik's meeting on social media dust