कागल : कागलमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या निकालाआधीच मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहु ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या समर्थकांनी विजयाचे फलक उभारले आहेत. यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहरप्रमुख अजित मोडेकर यांनी तक्रार केली आहे. यामुळे निकालाआधीच कागलमध्ये राजकीय वातावरण तंग झाले आहे. काही तासात निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.कागल नगरपालिका निवडणुकीत कट्टर विरोधी असलेले मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांची युती झाली होती. यामुळे जिल्ह्यासह राज्याचे कागलकडे लक्ष लागून राहिले होते. मुश्रीफ-घाटगे गटाची युती झाल्याने त्यांच्या समर्थकांना विजयाची खात्री वाटत आहे. दरम्यानच, आज मतमोजणीपुर्वीच मुश्रीफ-घाटगे यांची समर्थकांनी शहरात विजयाचे फलक उभारले आहेत.
Maharashtra Election Results 2025 Live: चांदा ते बांदा नगरपरिषद अन् नगरपंचायतीमध्ये कुणाची सत्ता?; मतमोजणीस सुरुवातयाप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहरप्रमुख अजित मोडेकर यांनी तक्रार केली. काही उमेदवारांनी तहसीलदार व निवडणूक निर्णय अधिकारी अमरदीप वाकडे यांच्याकडे तोंडी तक्रार केली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
Web Summary : Controversy erupts in Kagal as supporters of Minister Mushrif and Ghatge erect victory banners before election results. Thackeray group protests, escalating political tension. Police investigation ordered.
Web Summary : कागल में विवाद, मंत्री मुश्रीफ और घाटगे के समर्थकों ने चुनाव परिणाम से पहले ही जीत के बैनर लगाए। ठाकरे समूह ने विरोध किया, राजनीतिक तनाव बढ़ा। पुलिस जांच के आदेश।