शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

गुंड तहसीलदारसह समर्थक पसार

By admin | Updated: May 4, 2015 00:55 IST

सहाजणांची कारागृहात रवानगी : सर्व आरोपींवर गुन्हा दाखल

कोल्हापूर : पोलीस रेकॉर्डवरील ‘एसटी’ गँगचा म्होरक्या गुंड स्वप्निल तहसीलदार याच्या वाढदिवसाचा कार्यक्रम उधळून लावताना पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी त्याच्यासह समर्थकांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तहसीलदार हा काही साथीदारांसह रात्रीपासून पसार आहे. पोलीस त्याचा शोध घेत असून लवकरच त्याच्या मुसक्या आवळल्या जातील, अशी माहिती पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी दिली. कार्यक्रमाची परवानगी नाकारली असतानाही तहसिलदार याने कार्यक्रम घेण्याचे धाडस केल्याने पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी त्याचा कार्यक्रम उधळून लावण्याचे आदेश शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक चौधरी यांना दिले. त्यानुसार चौधरी यांनी शीघ्र कृती दलाच्या जवानांसह पोलिसांची फौज घेऊन दुपारी चारच्या सुमारास कार्यक्रम उधळून लावला. त्यानंतर तहसीलदार याने रात्री दहाच्या सुमारास मुस्कान लॉन येथे कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला. याठिकाणीही पोलीस येताच त्याच्या समर्थकांनी त्यांच्याशी हुज्जत घातली. यावेळी पोलिसांनी त्याचे समर्थक समीर ऊर्फ सोमनाथ जयवंत ढेरे (२२, रा. राजीव गांधी वसाहत, मार्केट यार्ड), सिद्धाप्पा माळाप्पा करगार (२१, रा. घोरपडे गल्ली, शाहूपुरी), अक्षय दगडू मधाळे (२१, रा. सदरबाजार, विचारेमाळ), मंगेश सुभाष आठवले (१९, रा. मार्केट यार्ड), सचिन सुरेश शिंदे (३०, रा. विक्रमनगर), मनोज धर्मेश माटनावळ (२२, रा. उचगाव, ता. करवीर) यांना अटक केली. त्यांना रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली. (प्रतिनिधी)