शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

निकाल लागताच तोडली अडीच हजार ग्राहकांची वीज कनेक्शन; सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात महावितरणची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 12:07 IST

कोल्हापूर : विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने कोल्हापूर परिमंडळामध्ये प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील ...

कोल्हापूर : विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने कोल्हापूर परिमंडळामध्ये प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील ४ लाख ९३ हजार ४१९ ग्राहकांकडे ७२ कोटी २४ लाख रुपयांची थकबाकी आहे. थकबाकी वसुलीच्या सूचना देण्यात आल्या असल्याने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील वीज बिल न भरणाऱ्या २३४२ वीज ग्राहकांचा पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्यात आला आहे.विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून अजून लोकांच्या अंगावर गुलाल आहे, तोपर्यंतच ही वसूली सुरू झाली आहे. वीज वापरली असल्याने त्याचे बिल वेळेत देणे ही ग्राहकांची जबाबदारीच आहे, परंतु निवडणूक असल्याने थकबाकी वसुलीची मोहीम सुरू नव्हती.कोल्हापूर परिमंडळात घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीमध्ये सांगली जिल्ह्यात २ लाख ४३ हजार १२९ ग्राहकांकडे ३६ कोटी ७४ लाख आणि कोल्हापूर जिल्ह्यात एकूण २ लाख ५० हजार २९० ग्राहकांकडे ३५ कोटी ५० लाख रुपयांची थकबाकी आहे. वीजबिल वसूलीवरच महावितरणचा डोलारा अवलंबून असल्याने वीजग्राहकांनी चालू व थकीत वीजबिलांचा त्वरित भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

कोल्हापूर परिमंडळात नोव्हेंबर महिन्यात वीज बिल थकविणाऱ्यांमध्ये सांगली जिल्ह्यातील १२३१ ग्राहकांचा समावेश असून, त्यांच्याकडे ६९ लाखांची थकबाकी होती, तर कोल्हापूर जिल्ह्यातील ११११ ग्राहकांचा समावेश असून, त्यांच्याकडे ४२ लाखांची थकबाकी आहे. ग्राहकांनी थकीत बिलांचा त्वरित भरणा करून सहकार्य करावे व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

कुणाकडे किती थकबाकी..कोल्हापूर : २ लाख ५० हजार २९०ग्राहक : ३५ कोटी ५० लाखसांगली : २ लाख ४३ हजार १२९ग्राहक : ३६ कोटी ७४ लाख

कुठूनही करा ऑनलाइन वीज बिल भरणा..वीजग्राहकांना वेबसाइटवर, तसेच महावितरणच्या मोबाइल ॲपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पद्धतीने विनामर्यादा वीजबिलाचा भरणा करता येतो, या व्यतिरिक्त महावितरणने ५ हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी आवश्यक माहितीचा तपशील संबंधित ग्राहकांच्या वीजबिलावर उपलब्ध आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSangliसांगलीmahavitaranमहावितरणelectricityवीज