शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Crimenews Police Kolhapur : चुकीबद्दल कारकुनाची अधीक्षकांकडून कानउघडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 12:16 IST

Crimenews Police Kolhapur : चोरीतील जप्त दागिने मूळ मालकाला देण्याऐवजी दुसऱ्याच गुन्ह्यातील अर्जदारास दिल्याचे चौकशी अहवालानंतर स्पष्ट झाले. त्यामुळे तत्कालीन कारकुनाला पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी चौकशीसाठी बोलवून चुकीबद्दल कानउघडणी केली. त्या कारकूनाने त्याच्या जबाबदारीवर पुन्हा न्यायालयीन प्रक्रिया राबवून दागिने जमा करून मूळ मालकास परत देण्याचे आदेशही त्यांनी दिले.

ठळक मुद्देचुकीबद्दल कारकुनाची अधीक्षकांकडून कानउघडणी कारकुनी तिढा : जप्त दागिने मूळ मालकास परत देण्याचे आदेश

कोल्हापूर : चोरीतील जप्त दागिने मूळ मालकाला देण्याऐवजी दुसऱ्याच गुन्ह्यातील अर्जदारास दिल्याचे चौकशी अहवालानंतर स्पष्ट झाले. त्यामुळे तत्कालीन कारकुनाला पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी चौकशीसाठी बोलवून चुकीबद्दल कानउघडणी केली. त्या कारकूनाने त्याच्या जबाबदारीवर पुन्हा न्यायालयीन प्रक्रिया राबवून दागिने जमा करून मूळ मालकास परत देण्याचे आदेशही त्यांनी दिले.न्यायालयाने आदेश देऊनही चोरीतील जप्त केलेले ३९ ग्रॅम सोन्याचे दागिने मुळ मालकास परत दिले नव्हते. दागिने परत मिळावेत यासाठी मूळ मालक सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक अशोकराव येणेचवंडीकर हे बसर्गे (ता. गडहिंग्लज) ते कोल्हापुरात करवीर पोलीस ठाणे तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात गेले अडीच वर्षे फेऱ्या मारत होते. या प्रकरणावर लोकमतने प्रकाशझोत टाकल्यानंतर चौकशी सुरू झाली. याप्रकरणी करवीर पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी चौकशी करुन तो अहवाल पोलीस अधीक्षक बलकवडे यांच्याकडे दिला.

ते जप्त केलेले दागिने मुळ मालकाला देण्याऐवजी दुसर्याच घरफोडी प्रकरणातील अर्जदारास दिल्याचे चौकशी अहवालात निष्पन्न झाले. विशेष म्हणजे, घरफोडीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त नसतानाही संबधीत कारकुनाने मुद्देमाल जप्तचा खोटा अहवाल न्यायालयात सादर करून दिशाभूल केल्याचे निदर्शनास आले. तसेच चोरीचे जप्त केलेले दागिने घरफोडीच्या गुन्ह्यात दाखवल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट झाले.त्यानुसार पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी तत्कालीन कारकुनास चौकशीसाठी बोलवून त्यांची कानउघडणी करत कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात पुन्हा स्वत:च्या जबाबदारीवर न्यायालयीन प्रक्रिया राबवून संबंधित दागिने परत मिळवून मूळ मालकाला देण्याचे आदेश दिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर