शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’ची चळवळ संपविण्यासाठी सुपाऱ्या

By admin | Updated: October 19, 2015 00:43 IST

रविकांत तूपकर : काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते संघटना फोडत असल्याचाही आरोप

पेठवडगाव : राष्ट्रवादी, काँग्रेसच्या काही नेत्यांनी शेतकरी संघटनेची माणसे फोडून चळवळ संपविण्याच्या सुपाऱ्या दिल्या आहेत. शेतकऱ्यांचे स्वयंघोषित नेते उसासाठी आंदोलन करतात की राजू शेट्टींवर टीका करण्यासाठी, ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून येण्याची ज्यांची लायकी नाही ते शेट्टींवर टीकाटिप्पणी करतात. त्यांच्या मोर्चाला माणसेच मिळत नाहीत, असा टोला वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तूपकर यांनी हाणला. हे नेते प्रिटींग प्रेसचे पुढारी असल्याचतूपकर म्हणाले, उसाचे गाळप झाल्यानंतर चौदा दिवसांच्या आत एकरकमी एफआरपीची रक्कम द्यावी, असा कायदा आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करीत साखर कारखानदार वार्षिक सभेत बेकायदेशीर ठराव करून एफआरपी रकमेचे तुकडे पाडत आहेत. याचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी संघटनेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामुळे स्वाभिमानीची क्रेझ अद्याप शेतकऱ्यांमध्ये असल्याचे सिद्ध झाले आहे. यामुळे टीकाकारांना उत्तर मिळाले आहे. विधानसभेत स्वाभिमानी संघटनेचे आमदार नसल्यामुळे सरकारच्या कलानुसार काम करणे भाग पडते. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नी मुख्यमंत्री आमच्यासोबतच आहेत. एफआरपीनुसार दर न देणाऱ्या कारखानदारांवर कारवाई करण्यास सरकारला भाग पाडू,पॅकेजची रक्कम हडप..सांगली जिल्ह्यातील राजारामबापू, हुतात्मा साखर कारखान्यांनी बेकायदेशीररित्या टनामागे अनुक्रमे १४७ व १०० रुपये कापले. को-जनरेशनच्या नावाखाली ‘राजाराम’ने २६ कोटी, तर ‘हुतात्मा’ने पावणेसात कोटी शासनाच्या पॅकेजमधील रक्कम हडप केली आहे, असा घणाघात तूपकर यांनी केला.