कात्रज येथे रविवारी कुस्ती स्पर्धा निवड चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:04 IST2021-01-13T05:04:41+5:302021-01-13T05:04:41+5:30
कोल्हापूर : भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने २३ वी वरिष्ठ महिला फ्रीस्टाईल राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा दि. ३० आणि ३१ जानेवारीला ...

कात्रज येथे रविवारी कुस्ती स्पर्धा निवड चाचणी
कोल्हापूर : भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने २३ वी वरिष्ठ महिला फ्रीस्टाईल राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा दि. ३० आणि ३१ जानेवारीला आग्रा (उत्तर प्रदेश) येथे होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र महिला संघाची निवड चाचणी कुस्ती स्पर्धा रविवारी (दि.१७) कात्रज (पुणे) येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात आयोजित केली आहे. कुस्तीगिरांचे वजन सकाळी ९ ते ११ या वेळेत केले जाईल. निवड चाचणीची सुरुवात सकाळी ११ वाजता होणार आहे. ही चाचणी ५०, ५३, ५५, ५७, ५९, ६२, ६५, ६८, ७२ आणि ७६ किलो वजन गटात होईल. या चाचणीत सहभागी होणाऱ्या कुस्तीगिराचे वय २० वर्षे आणि त्यापेक्षा जास्त असले पाहिजे. ज्या कुस्तीगिराचे वय १८ अथवा १९ वर्षे आहे. त्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांचे तंदुरुस्ती प्रमाणपत्र आणि पालकांचे संमतीपत्र आणावे. खेळाडूंनी स्पर्धेस येताना मूळ आधार कार्ड, जन्मदाखला ही कागदपत्रे सोबत आणावीत. अधिक माहितीसाठी इच्छुक कुस्तीगिरांनी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघामध्ये संपर्क साधावा.