शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
4
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
5
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
6
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
7
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
8
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
9
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
10
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
11
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
12
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
13
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
14
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
15
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
16
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
17
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
18
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
19
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
20
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात लाईव्ह व्हिडिओ करत विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:57 IST

कोल्हापूर : मोबाईलवर लाईव्ह व्हिडिओ करत एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आर. के. नगरातील हरी पार्क, पोस्टल ...

कोल्हापूर : मोबाईलवर लाईव्ह व्हिडिओ करत एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आर. के. नगरातील हरी पार्क, पोस्टल कॉलनीत बुधवारी मध्यरात्री घडली. धनश्री आप्पा जाधव (२५, सध्या रा. आर. के. नगर, कोल्हापूर. मूळ गाव एरंडोल, ता. आजरा) असे मृत महिलेचे नाव आहे. उदय पालकर (रा. आर. के. नगर) या घरमालकांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

धनश्री जाधव यांचा विवाह झाला होता. त्यांना एक मुलगाही आहे. तो आई-वडिलांकडे असतो. त्या पतीपासून विभक्त राहत होत्या. पुण्यात दोन वर्षे खासगी नोकरी करून त्या गेली वर्षभर कोल्हापुरात आर. के. नगरातील पालकर यांच्या घरी भाडेकरू म्हणून राहत होत्या. एका बँकेच्या क्रेडिट कार्ड मार्केटिंगचे काम त्या करत होत्या. त्यांची कोल्हापुरात एकासोबत मैत्री जमली होती. बुधवारी रात्री त्यांनी मित्राशी संवाद साधला. त्यानंतर विवाहितेने गळफास लावून आत्महत्या करत असल्याचे मोबाईलवरून व्हिडिओ मित्राला पाठविला. त्यावेळी मित्राने धनश्री जाधव राहत असलेले घर गाठले. मित्राने घरमालक पालकर यांना परिस्थिती सांगितली. त्यांनी दार ठोठावून धनश्रीला दार उघडण्याबाबत विनंती केली पण प्रतिसाद न आल्याने त्यांनी खिडकीतून पाहिले असता त्यांनी छताच्या पंख्याला वायरीने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले.

खोलीमध्ये मिळालेल्या सुसाईड नोटवर आत्महत्येस कुणालाही जबाबदार धरू नये, असा मजकूर आहे. त्यामुळे त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज करवीर पोलिसांनी व्यक्त केला.

--------------------------------

भविष्यकाळ वाईट आहे...

धनश्री जाधव ह्या माझा भविष्यकाळ वाईट आहे, असे वारंवार मित्रांना सांगत होत्या. स्वभावाने हट्टी होती, असे तिच्या आई-वडिलांनी सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले.

--------------------------------

व्हिडिओ जप्त

आत्महत्या करत असल्याचा मोबाईलवरील व्हिडिओ विवाहितेने तिच्या मित्राला पाठविला होता. तो व्हिडिओ करवीर पोलिसांनी जप्त केला.