शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

महिला अधिकाऱ्याच्या त्रासातून कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न; कोल्हापुरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 12:51 IST

कोल्हापूर : येथील राज्य शासनाच्या वस्तू व सेवांचा व्यवहार सांभाळणाऱ्या कार्यालयात सोमवारी दुपारी त्याच कार्यालयातील महिलेने वरिष्ठांच्या अवमानजनक बोलण्याच्या ...

कोल्हापूर : येथील राज्य शासनाच्या वस्तू व सेवांचा व्यवहार सांभाळणाऱ्या कार्यालयात सोमवारी दुपारी त्याच कार्यालयातील महिलेने वरिष्ठांच्या अवमानजनक बोलण्याच्या रागातून फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बुधवारी संबंधित महिला अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी वरिष्ठांना भेटून केली. परंतु यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल झालेली नाही.कोल्हापुरातील कसबा बावडा रोडवर असलेल्या या कार्यालयात हा प्रकार घडला. त्रास देणारी अधिकारीही महिलाच आहे. ज्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला त्या सांगलीच्या आहेत. दैनंदिन काम करताना या महिला अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देत असल्याच्या तक्रारी आहेत.सोमवारी दैनंदिन काम सुरू असताना त्यात काही तरी त्रुटी राहिल्यावर त्या महिला कर्मचाऱ्यांवर खेकसल्या. तुम्ही एवढ्या निर्बुद्ध असताना राज्य लोकसेवा आयोगाने तुम्हाला कसे निवडले, अशी भाषा त्यांनी वापरली. तुम्ही या कार्यालयात काम करण्याच्या लायकीच्याच नाही, असेही त्या म्हणाल्यावर त्या महिला कर्मचाऱ्याने गळ्यातील ओढणी काढून फॅनवर टाकली आणि त्यांच्यासमोरच कार्यालयातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिथे झालेला आरडाओरडा ऐकून अन्य कर्मचाऱ्यांनी त्यांना तसे करण्यापासून परावृत्त केले परंतु त्यामध्ये फॅनची पाती वाकली आहेत. असा प्रकार घडूनही त्या महिला अधिकाऱ्यांनी तुला आत्महत्याच करायची असेल तर बाहेर जावून कर, किंवा तिसऱ्या मजल्यावरून उडी मार जा..माझ्या कार्यालयात काय करू नकोस, अशी भाषा वापरल्याची माहिती जबाबदार सूत्रांकडून मिळाली. ही अधिकारी संवेदनाहीन असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी