शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

Kolhapur: खेळण्यांची जत्रा, तिच्यावर अभ्यासाची मात्रा; खेळणी विकण्यात मदत करत दहावीत सुहानाचे यश

By संदीप आडनाईक | Updated: May 14, 2025 15:35 IST

अनेकदा वर्गशिक्षकांकडून विचारणा व्हायची, पण परिस्थितीची जाणीव असलेल्या सुहानाने कधी प्रत्युत्यर दिले नाही, मान खाली घालून ती याबाबत निरुत्तर व्हायची

संदीप आडनाईककोल्हापूर : शाहू कॉलेजमध्ये साध्या घरात राहणारी आणि वडील रफिक शेख यांना जत्रेच्या हंगामात खेळणी विकण्यात मदत करून कोरगावकर हायस्कूलच्या सुहाना रफिक शेख हिने शालान्त परीक्षेत ८४ टक्के गुण मिळवून लखलखीत यश मिळवले आणि आईवडिलांच्या कष्टाचे चीज केले.दैनंदिन जीवनात रिक्षा चालवणे हाच तिच्या वडिलांचा व्यवसाय, मात्र या व्यवसायामध्ये आर्थिक बेरजेपेक्षा वजाबाकीचेच गणित अधिक असल्याने साईड बिजनेस म्हणून तिच्या वडिलांनी पंचक्रोशीतील गावांमध्ये आणि परिसर, उपनगरामध्ये जत्रा आणि यात्रात खेळणी विकण्याचा व्यवसाय पत्करला. एकट्याला हा व्यवसाय करणे आणि त्यावर नियंत्रण करणे जमत नसल्याने अनेकदा छोट्या सुहानाची मदत मिळायची, बऱ्याचदा यासाठी तिची शाळाही चुकायची. अनेकदा वर्गशिक्षकांकडून विचारणा व्हायची, पण परिस्थितीची जाणीव असलेल्या सुहानाने कधी प्रत्युत्यर दिले नाही, मान खाली घालून ती याबाबत निरुत्तर व्हायची. आपल्या व्यवसायामुळे मुलीची शाळा चुकते याची तिच्या वडिलांनाही खंत असायची. बरेचदा वडील शाळेत येउन शिक्षकांकडे आपल्या भावना व्यक्त करत. मात्र, आपला बुडालेला अभ्यास सुहाना ज्या ठिकाणी जत्रेमध्ये स्पॉट असे त्या ठिकाणी थांबून वेळ मिळेल तेव्हा अभ्यासाचे पुस्तक घेऊन बसायची. ज्यावेळी ग्राहक नसेल त्या वेळेला पुस्तकांच्या पानांशी ती अधिक मैत्री करायची. काही मैत्रिणींना विचारून शाळेतला बुडलेला अभ्यास पूर्ण करून तो अभ्यास ती शिक्षकांना दाखवत असे . केवळ अभ्यासातच नव्हे तर ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकारातही तिचे नैपुण्य होते. या प्रकारातील ग्रेसमार्कही तिला मिळालेले आहेत. शाळेतील सांस्कृतिक विभाग तिच्याशिवाय पूर्ण होत नसे. गाणी, वक्तृत्व, एकपात्री प्रयोग यामध्येही तिने आपला वेगळा ठसा उमटवला होता. एकंदरीत सुहानाच्या या यशाला सोनेरी किरण लाभल्याने पालकांसह शाळेतील प्रत्येक घटकास आनंद झाला आहे. कोरगांवकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे, पर्यवेक्षिका प्रमिला साजणे, सुरेखा पोवार, वर्गशिक्षिका हेमलता पाटील आणि सर्वच विषय शिक्षकांनी सुहानाचे यशाबद्दल भरभरून कौतुक केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSSC Resultदहावीचा निकाल