शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई: वाशीत कारमध्ये १६ लाख रुपयांची रोकड सापडली, आचारसंहिता पथकाची कारवाई
2
"पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांना वेळीच फोन केला असता तर...!"; अमेरिकन वाणिज्यमंत्र्याचा मोठा खुलासा
3
'स्टॉपेज रेशो'ने वाढवली धाकधूक! गुंतवणूकदार म्यॅुच्युअल फंडातून का पडतायत बाहेर?
4
सबरीमाला मंदिरातील सोन्याच्या चोरी प्रकरणी मुख्य पुजारी ताब्यात, एसआयटीची कारवाई   
5
एस जयशंकर यांना अमेरिकेत करावा लागला रस्त्याने ६७० किमी प्रवास; बलाढ्य अमेरिकेवर ट्रम्प यांनी ही काय वेळ आणली...
6
‘महायुती सत्तेवर आली तरी मुंबईचं बॉम्बे होणार नाही, पण उद्धव ठाकरे सत्तेवर आले तर...’, नितेश राणेंचा दावा 
7
कर्जबाजारी पाकिस्तानचा ओव्हर कॉन्फिडन्स; फायटर जेट विकून IMF चे कर्ज फेडण्याचा दावा
8
केवळ एकच व्हिडीओ, अन् यूट्युबवर लावली ‘आग’, केली ९ कोटींची कमाई, नेमकं काय आहे त्यात? 
9
PMC Election 2026: शिवसेना स्वबळावर लढत आहे, म्हणून कुणीही हलक्यात घेऊ नका; एकनाथ शिंदेंचा इशारा
10
"इम्तियाज जलील हा भाजपाचा हस्तक, त्याने शहराला..."; ठाकरेंच्या नेत्याचा घणाघात, फडणवीसांवरही 'बाण'
11
डोनाल्ड ट्रम्प यांची आर्थिक 'दादागिरी'? उदय कोटक यांनी २०२४ मध्येच केली होती भविष्यवाणी
12
स्टार क्रिकेटर Jasprit Bumrah चा 'रशियन सुंदरी' सोबतचा फोटो व्हायरल; कोण आहे 'ही' तरुणी?
13
Chanakya Niti: अपमान करणाऱ्याला कसं उत्तर द्यायचं? शिका चाणक्य नीतीचे 'हे' ५ वाग्बाण 
14
मोठा निष्काळजीपणा! नर्सने कापला दीड महिन्याच्या बाळाचा अंगठा, नेमकं काय घडलं?
15
० ० ० ० ० ० ... ६ चेंडूत हव्या होत्या ६ धावा... महाराष्ट्राचा 'जादूगार' रामकृष्णने जिंकवली मॅच
16
तुमचा iPhone हॅक तर झाला नाही ना? 'या' ४ गोष्टी दिसताच समजा कुणीतरी करतंय तुमची हेरगिरी
17
इराणच्या 'या' निर्णयाचा भारताला मोठा फटका, 2000 कोटी रुपयांवर आडलं घोडं...! काय आहे संपूर्ण प्रकरण?
18
भारतीय क्रिकेट विश्वावर शोककळा; मैदानावरच फलंदाजाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
19
Malegaon Municipal Election 2026 : भाजपच्या दोन बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी, वरिष्ठांच्या आदेशान्वये कारवाई
20
अपघातग्रस्तावर मोफत उपचार! मदत करणाऱ्याला ₹25 हजारांचे बक्षीस; मोदी सरकार आणतेय नवीन योजना
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: वीजतारांच्या शॉर्टसर्किटमुळे १५ एकरांवरील ऊस जळून खाक, मडिलगे बुद्रुक येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 17:45 IST

आगीत अंदाजे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले

गारगोटी: मडिलगे बुद्रुक (ता. भुदरगड) येथे वीजपुरवठा करणाऱ्या तारांचे शॉर्टसर्किट झाल्याने भीषण आग लागून सुमारे १५ एकर क्षेत्रातील ऊस पिक जळून खाक झाला. आगीत शेतकऱ्यांचे अंदाजे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले. आज, बुधवारी दुपारी ही घटना घडली.गावाच्या शेजारी असलेल्या कुर पाणंद शेत परिसरात दुपारच्या सुमारास विजेच्या तारांचे शॉर्टसर्किट झाले. विजेच्या ठिणग्या पडल्याने क्षणात उसाच्या पिकाने पेट घेतला. उसाच्या वाळलेल्या पानांमुळे आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले. शिवाजी उगले, शंकर माळवेकर, सात्तापा गोजारे, पिंटू मोरे यांच्यासह शेतात काम करणाऱ्या अनेकांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली. मात्र वाऱ्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले.शिवाजी उगले यांनी तत्काळ महावितरणशी संपर्क साधून विद्युत पुरवठा खंडित करण्यास सांगितले. त्यानंतर बिद्री साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात पसरली होती. अग्निशमन दलाच्या जवानांच्या सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. तोपर्यंत जवळपास पंधरा एकरातील ऊस जळून खाक झाला होता. आगीत सुधा पंडित, सर्जेराव शिंदे, एकनाथ माने, धनाजी देसाई, विश्वजीत देसाई, प्रभाकर धुमाळ, रघुनाथ उगले, उत्तम सुर्वे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे ऊस पीक पूर्णतः जळाले. हातातोंडाशी आलेले पीक आगीच्या भक्षस्थानी पडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले. दरम्यान, तहसीलदार अर्चना पाटील यांनी तलाठ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Sugarcane Crop Destroyed in Fire Due to Short Circuit

Web Summary : A fire in Madilage Budruk, Kolhapur, caused by a short circuit, destroyed 15 acres of sugarcane. Farmers suffered an estimated loss of ₹30 lakhs. Firefighters extinguished the blaze after two hours. An investigation is underway.